Homeमुक्त- व्यासपीठमी मेल्यानंतर…

मी मेल्यानंतर…

माझ्या घरासमोर कोणी गर्दी करू नका
माझ्या निपचित पडलेल्या देहाकडे
बघून कुणी अश्रु डहाळु नका,
सुरकुतलेला माझा चेहरा शांत झाला असेल
आठवणींचा पागुळ आणून कोणी मला जागे करू नका,
ऊर बडवून रडतील काही ‘जे नव्हते माझे कधीच’
सुख आणि दुःखाच्या खेळातले ते चार ‘लोक’ तुम्हीच,
शेवटची अंघोळ घालून ,माझ्या नाकात बोळा घातला जाईल आसुसलेले प्रत्येक मन मला डोळे भरून पाहिल,
आणि ; आम्ही देखील आलो होतो
हे सांगण्यासाठी प्रत्येक चेहरा
माझा मायबापा पुढं हजेरी लावून जाईल,
माझा चांगुलपणा सांगून कित्येक परके ही रडतील
झालं असलं तुमच आता!
असं म्हणून आपलेच स्मशानाकडे काढतील,
लाकडावर लाकूड ठेवून अगदी थाटात पेटवून द्याल मला
खूपणारा प्रत्येक डोळा म्हणेल बरे झाले लवकर निघून गेला, माती चुकलेला प्रत्येक जण परत माझ्या तिसऱ्याला येईल अस्तींना हात लावून कावळा शिवण्याची वाट पाहिल,
अन् नाहीच शिवला कावळा ; तर गाई आणली जाईल
जाणारा निघून जातो असं सांगून अख्खा गाव जेऊन जाईल, दुःखाचा डोंगर कोसळलेलं घर काही क्षणात शांत होत असेल
येतो आता, असं सांगून प्रत्येकजण निरोप घेताना दिसेल,
काय सांगावं? नाहीच मिळाला वेळ यांना ;
तर तिसऱ्यालाच दहावा करून टाकतील
परत मात्र कार्याला;
माझ्याच फोटो समोर बसून शिरा भात खाऊन जातील,
झालं गेलं, होत राहतं, सावरून घ्या स्वतः ला
सांगून जातील काहीजण जाता-जाता माय बापाला
दुःख संपून जाईल, सुतक संपून जाईल,
शेवटी मात्र माझ्याच घरात गोड घास केला जाईल,
हळूहळू पुन्हा एकदा जगण्यात आनंद भरेल
काळोखाच्या पडद्याआड जाणाऱ्या प्रत्येकाचा
इथं मात्र विसर पडेल,
माझ्या जाण्याने कुणाला फरक पडेल असं मला तर वाटत नाही आणि जर पडलाच कोणाला फरक तर ते फक्त माझे होते;
बाकी या दुनियेत माझं कुणीच उरलं नाही

  • विठ्ठल जगताप

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular