यंदाचाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’ असे आवाहन करताना राज्य सरकारने करत नियमावली जाहिर केली . जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत…
काय आहेत नियम
१) गणेशोत्सवासाठी परवानगी घेणे अपेक्षित, मंडप परिसरात गर्दी नको. सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.
२) आरती, भजन, कीर्तनासाठी होणारी गर्दी टाळावी. मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी.
३) श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट, तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा असेल.
४) पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर मूर्तीचे पूजन करावं. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन घरीच करावं.
५) कोणी स्व-इच्छेने वर्गणी देत असेल, तरच त्याचा स्वीकार करावा. आरोग्यविषयक जाहिरातींना प्राधान्य द्यावं.
६) रक्तदान शिबिरे, डेंगी, मलेरिया, कोरोनासारख्या आजारांबाबत जनजागृती करावी.
७) श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करुन द्यावी.
८) प्रत्यक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतर, तसेच मास्क, सॅनीटायझरचा वापर करावा.
९) ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावं.
१०) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करावी.
११) श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व ज्येष्ठांनी विसर्जनास्थळी जावू नये.
हे नियम पाळले नाहीत तर कारवाई होणार असून त्यापासून वाचण्यासाठी नियम पाळणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यसंपादक