Homeमुक्त- व्यासपीठडिफेक्टिव्ह पिस

डिफेक्टिव्ह पिस

                           

डिफेक्टिव्ह पिस म्हणून मला कायम माझी भावंडं हिणवत असत….कारण….

मी राम शिवगण. सध्या ड्रायव्हर म्हणून साठे साहेबांकडे आहे. साहेब स्वभावाचा एकदम लाख माणूस. वेळेत देवासारखे माझ्यापाठी उभे राहिले
….म्हणून लाख नाही…. खरोखरचा लाख माणूस
….

माझी साई सर्व्हिसची नोकरी अचानक मला सोडायला लागली. स्टोअर्स मध्ये स्टॉकचा कुणीतरी घोळ घातला….आणि कुणी तरी माझा बकरा केला….मला माहित आहे कुणी ते पण मी माझं तोंड त्यांचं नाव घेऊन खराब करणार नाही..

                         *****

साठेंची गाडी माझ्याकडे सर्व्हिसिंगला यायची. बरेच वेळा घरी जाऊन सुध्दा गाडीच काम केलं आहे मी….नोकरी गेली हे त्यांना कंपनीतून कळलं. घरी फोन आला….आणि मी साठेंचा ड्रायव्हर झालो….

                          *****

त्या दिवशी साहेबाना त्यांच्या घरी सोडून मी घरी उशिरा आलो. घरचे सगळे जेवायचे थांबलं होते. आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण झाल्यावर बायकोनी मला कुरिअर दिलं….एक जाडजूड एनव्हलोप आला होता.

एनव्हलोपवर नाव होत शिखु अडवाणींचे. मी अशा गृहस्थाला ओळखत नव्हतो. आत तीन लेटर्स होती. मी एक एक करून ती उघडली….

पहिलं लेटर…..
मग दुसरं….
आणि तिसरं तर …..

……जसजसा वाचत गेलो तसतशी माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली….

                       *****

मी साठेना तीनही पत्र दाखवली. त्यांनी शिखु अडवाणी कोण ते सांगितल….मला हळू हळू काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या….
‘ साहेब मला पाच हजार द्याल….पगारातून कमी करा….आज पर्यंत मी पैसे कधी मागितले का ? नाही ना ! ‘
‘ देतो पण का हवे ?….मग मी कारण सांगितले
…त्यांनी त्यांची हॅण्ड बॅग उघडली….त्यातून पाच हजार काढून दिले…..

                         *****

त्या दिवशी मी साहेबाना पुण्याला सोडून मुंबईला परत येत होतो….ते तीन दिवस पुण्यात राहणार होते…. माझं पुण्यात कुणी नसल्या कारणाने मी मुंबईला परत जावे असे त्यांचं म्हणणं पडलं. तीन दिवस मी त्यांच्या मरसीडिज मध्ये राहणे त्यांना स्तुत्य वाटत नव्हतं….म्हणून मुंबईला मरसीडिजने परत येत होतो…..

घाटात पाऊस सुरू झाला. एका वळणावर मला कुणाची तरी गाडी बंद पडलेली दिसली. का माहित नाहीं पण मी माझी गाडी स्लो केली. मागून वाहनं येत नाही असं बघून मी माझी गाडी त्या गाडीच्या बरोबरीने उभी केली….
गाडी बाहेर एक मुलगी पूर्ण भिजलेली उभी होती.
इतक्या पावसात ही गाडी बाहेर उभी म्हणजे गाडीचा ए.सी. सुध्दा ठप्प झाला असणार….आत बसवलं नसणार ….. उजव्या हातात मोबाईल घेऊन तो डाव्या हातावर मारीत होती….बहुतेक रेंज नसणार किंवा बॅटरी डाऊन होती…..

‘ माझी मदत हवी आहे का ? मी डाव्या हाताने काच खाली करत….जरा वरच्या पट्टीत म्हणालो.
‘ तिच्या डोळ्यात ‘ हो ‘ दिसत होत पण ‘ नाही ‘ म्हणाली….
मी थोडा पुढे गेलो आणि गाडी रिव्हर्स घेतली. खाली उतरलो….रिप रिप पाऊस सुरूच होता….
‘ काय झालं गाडीला….? ‘
‘ ड्रायव्हरला माहित आहे…. तो चालत चालत पुढे कुठेतरी गेला आहे….दहा मिनिट झाली….’
‘ मी बघू का ? होत असेल तर करतो नीट….’
ती नाखूष होती माझ्या ह्या बोलण्यावर….
‘ बघू का ? ‘ मी पुन्हा विचारलं…. ‘ तुमची ही मरसीडीज आहे आणि माझी ही मरसीडीज आहे….मी म्हणालो…
ह्या वाक्यवर तिने माझ्याकडे ज्या नजरेनी पाहिलं त्याचा अर्थ मी लगेच पकडला….
मी दिसायला अगदी सुमार होतो….त्यात माझ्या अंगभर मंकी व्हायरस मुळे राहिलेले फोड….तुच्छ भावनेने दिलेला तो लूक….अहो घरचे मला ‘ डिफेक्टिव्ह पिस ‘ म्हणतात….तुम्ही नजरेनी म्हणताय मला कळतय ….मी मनात म्हणालो….

‘ द्या चावी….मी काही पैसे घेणार नाही….गाडी रिपेअर करून देईन….’
‘ तुम्ही एक काम करा माझ्या वडिलांना फोन करा आणि त्यांना सांगा….गाडी बंद पडल्याचे….माझी मोबाईलची बॅटरी पूर्ण ड्रेन झाली आहे…गाडीत चार्जिंगला लावला होता….पण लगेच बंद पडली
….ड्रायव्हरच्या मोबाईलला रेंज नव्हती…तुमच्या येते का बघा….’
‘ बघतो…नको एक काम करा….माझ्या फोन वरून तुम्हीच बोला त्यांच्याशी….मला चावी द्या मी बघतो….होईल चालू लगेच….’
‘ तुम्हाला गाडीतल काही कळत का ?… त्यात ‘ ही मर…’…..’
मी चावी घेतली…. सगळें प्रकार करून बघितले
….माझ्या लक्षात आलं नक्की काय बिनसले आहे ते….मी माझ्या गाडीच्या चावीने माझी डिकी उघडली….त्यातील एक चटई काढली….आणि गाडी खाली गेलो…. बराच वेळ काढला….कुठे तरी गाडी आपटली होती….आणि गाडीच्या वायर्स मध्ये पण काही डिफेक्ट दिसला….आणी काही लावलेले पार्टस खटकले….’ हा नक्कीच ‘ डिफेक्टिव्ह पिस ‘ आहे असं म्हणत मी खालून बाहेर आलो….कपड्यांची पूर्ण नासाडी झाली होती….चिखलात माखलेले डुक्कर….मी चटई गाडीच्या डिकीत टाकली….आणि गाडीतले दुसरे कपडे घातले…..पाऊस थांबला होता….थोडासा सूर्य डोकावूं लागला होता….पुन्हा बाईंच्या गाडी कडे येत….
‘ बाई हे नवीन मॉडेल आहे….पण माझ्या मते तुमच्या गळ्यात मारलेला हा डिफेक्टिव्ह पिस आहे…’
तिने एकदा गाडीकडे पाहिलं एकदा माझ्याकडे पाहिलं…
‘ सिरीयसली सांगतोय….पिस डिफेक्टिव्ह आहे… मी कित्येक वर्ष साई सर्व्हिस मध्ये चीफ फ्लोअर सुपरवायझर म्हणून गाड्यांची कामं कित्येक वर्ष बघायचो…. इतना तो मेरा हक बनता हैं….
मुंबईतील सगळ्या श्रीमंतांच्या गाड्या माझ्या हाता खालून गेल्या आहेत…. ‘
हे ऐकून ती काहीच बोलली नाही….
तिने माझ्याकडे फोन मागितला, वडिलांना फोन लावला….आणि मला परत दिला….
‘ काय म्हणतात ते ? ‘
‘ थांब म्हणाले….ते दुसरी गाडी पाठवतात म्हणाले ‘
‘ बाई माझ्यावर विश्वास ठेवा….ही गाडी आज चालू होणार नाही….शिवाय गाडी कुठे तरी आपटली आहे….अहो खूप प्रॉब्लेम्स आहेत ह्यात…. ऐका माझं ….तुम्ही माझ्या गाडीत बसा
….मी मुंबईला सोडतो….विश्वास ठेवा….माझ्या ह्या रुपावर जाऊ नका….मला माझी भावंडं ‘ डिफेक्टिव्ह पिस ‘ म्हणतात….पण कामाला मीच येतो सगळ्यांच्या….मी राम शिवगण….माझा फोन आहे तुमच्या वडिलांकडे….मग मी इंग्लिश मध्ये बोलून बाईला समजावलं…. माझं शिक्षण कमी असेल पण नियत एकदम साफ आहे म्हणालो….असे म्हणून मी माझ्या गाडीकडे जाऊ लागलो….
तिला तिच्या नशिबावर सोडून…..
‘ राम, राम….’ हाक ऐकू आली…..

आम्हाला मध्ये तिचा ड्रायव्हर परत येताना दिसला….मी गाडी बाजूला घेतली….तिने त्याला गाडी कडेच थांबायला सांगितलं….वडिलांनी डिलरला फोन केला आहे…त्यांचा माणूस येईल आणि गाडी घेऊन जातील, मग तू घरी जा सांगितलं…त्याला पाचशे रुपये दिले….आम्ही निघालो….गाडीत त्या मागे बसल्या होत्या…एक शब्द बोलल्या नाहीत….

मी बाईना नेपियन सी रोडवर सोडून पुढे घरी गेलो….लकीली साठेंच्या मुलीची बॅग डिकीत होती….त्यातले कपडे बघा होतात का अस सांगून मी लांब जाऊन उभा राहिलो….तिने माझे ऐकले होते….त्यातली एक जोड तिने परिधान केली होती….म्हणजे आधी ती तयार नव्हती….पण ज्या वेळी मी तिला म्हटले तुम्ही ह्या अशा ओल्या बसलात तर सिट खराब होतील….त्यात त्याचे पांढरे शुभ्र कव्हर…ते पूर्ण खराब होईल….साठेना आवडणार नाही….लिफ्ट दिली म्हणून काहीच बोलणार नाहीत पण कव्हर्स…..ती हो म्हणाली होती….
मध्ये दोन मॉलस मध्ये थांबलो….एकदा फ्रेश व्हायला….आणि एकदा नाष्टा करायला….

आम्ही मुंबईला पोहचलो….मी त्यांना त्यांच्या बिल्डिंग खाली सोडले….बाई खाली उतरली आणि काहीही न बोलता निघून गेली….. श्रीमंतांच हे असच असत….मी घरी येऊन बायकोला सांगितल तेव्हा ती म्हणाली…..

                      *****

आणि एक महिन्यानंतर….

घरी यायला उशीर झाला होता….जेऊन झाल्यावर बायकोनी मला कुरिअर मधून एक जाडजूड एनव्हलोप आला होता तो दिला.

एनव्हलोपवर नाव होत शिखु अडवानीच. मी अशा गृहस्थाला ओळखत नव्हतो. आत तीन कागद होते. मी एक एक करून ते उघडले
…..
…..आणि माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली….

पहिलं लेटर…..शिखू अडवानी बरोबर मीटिंग होती….अडवानी आदी गोदरेजचा चीफ सेक्रेटरी होता….
मग दुसरे ….मला ड्रायव्हरचे ऑफर लेटर होते….

आणि तिसरे तर ….

मी साठेंकडून घेतलेल्या पैशात नवीन कपडे घेतले….काहीं उरले ते मी त्यांना परत दिले….

ठरलेल्या वेळेस मी विक्रोळीच्या गोदरेज हाऊस मध्ये पोहचलो….नवीन कपडे घातले होते तरी माझं रूप काही बदलले नव्हते….लोकांची नजर मला स्वीकारायला तयार नव्हती…. तुच्छतेनेच बघत होते सारे…. मंकी व्हायरस मुळे अंगावर राहिलेले फोड…..

मी बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर पोहचलो
….माझ्याकडचे पहिले पत्र बाहेर बसलेल्या मुलीला दिले….ती मला एका मोठ्या केबिन मध्ये घेऊन गेली….

प्रशस्त केबिन होतं….आत जाताच तिघ जण होते
…. मला बघून तिघेही उभे राहिले….
‘ या, बसा काय घेणार….? ‘
ज्या बाईना मी घरी सोडलं होत त्या हे म्हणाल्या होत्या….मला जरा नवलच वाटल….खाली उतरल्यावर ज्या बाईने माझे आभार सुध्दा मानले नव्हते ती हे सगळ म्हणत होती ?
मी चहा घेईन म्हणालो.
एक शीखु अडवानी होता तर दुसरे आदी गोदरेज होते….
घरी कोण असत विचारून झाल्यावर मग शिक्षणवर प्रश्न सुरू झाले….मग ड्रायव्हर म्हणून राहणार का म्हणून प्रश्न सरू झाले….मग पगाराची अपेक्षा काय ? ह्यावर विषय सरकला…. मग कुठल्या गाड्या चालवता येतात ह्याची विचारपूस झाली….

माझं डोकं खूप फास्ट चालत होतं जणू मी गाडी १२० १३० च्या स्पीडनी पळवत होतो….पहिल्या दोन लेटर्सची उत्तरं मला मिळाली होती….आता हे तिसऱ्या लेटर बद्दल बोलणार का त्या बद्दल मी बोलायचं होतं काहीच कळायला मार्ग नव्हता…

कधी पासून जॉईन करू शकतो विचारू लागले
….मी साठेंबद्दल त्यांना सांगितलं….त्यांच्याशी बोलून घेतलं आहे म्हणाले….तुमची पूर्ण माहिती आहे आम्हाला….

मग त्या बाई बोलू लागल्या….म्हणाल्या माझा ड्रायव्हर म्हणून मी ठेवणार तुला… राहतं घर सोडून मागे क्वार्टर आहेत तिकडे राहावं लागणार तुम्हाला….कंपनीची पॉलिसी आहे तशी….

मला राहवलं नाही….मी कोटाच्या खिशात हात घातला आणि तिसरं पत्र काढलं….म्हणालो ‘ हे मला कळलं नाही….हे काय आहे ? ‘

आता पहिल्यांदा आदी गोदरेज बोलू लागली….ते म्हणाले…..’ एव्हढी महागडी कार ….ती डिफेक्टिव्ह आहे हे तू सांगू शकलास म्हणून आम्ही तुला ठेऊन घेत आहोत….एका महिन्यात गाडीच्या कंपनीशी आणि मुंबईतल्या डीलरशी आम्ही पत्र व्यवहार केला…. त्यांनां तुम्हीं सांगितलेले सगळे डीफेक्ट्स सांगितले…. त्यांनी कार नवीन देण्याचं कबूल केले आहे…..

त्या गाडीचा रीपेरींगचा खर्च साधारण दीड लाखाच्या घरात जाणार होता….आम्हाला जर तू हे लक्षात आणून दिले नसतेस तर कंपनी जे पार्टस बदलून देणार होती ते पार्टस वॉरंटी मध्ये येतं नाहीत म्हणून त्यांनी आमच्या कडून पैसे घेऊन बदलून दिले असते….पण तसं झालं नाही
….तुझ्यामुळे…..आम्हाला नवीनच गाडी देऊ करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे….अरे आम्ही विचार केला आमचे इतके पैसे वाचवणारा तू तुला काही तरी मोबदला द्यायला हवा म्हणून आम्ही तुला नोकरी देण्याचं ठरवलं….आणि तुझ्या बँकेचं कर्ज फेडून टाकायचा निर्णय घेतला…..तुझे कर्ज अठ्ठेचाळीस हजार आहे, ते फेडायच ठरवलं
…..हेच तुझं तिसरं लेटर…..

तर उद्या पासून रुजू हो….आम्ही एका महिन्यात साठेना नवीन ड्रायव्हर देण्याचं कबूल केलं आहे….

तू आमच्याकडे काम केल्यावर तुला कुणीच
डिफेक्टिव्ह पिस म्हणणार नाही….कारण ‘ वी आर नोन फॉर अवर क्वालिटी ‘…आमच्याकडे डिफेक्टिव्ह पिस तयार होत नाहीत….आणि मिळत देखील नाहीत…..

  • मंगेश वर्दे ( सो- सो . मी)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular