Homeवैशिष्ट्येगोड तुझे रूप देवा. न समजे कोणास

गोड तुझे रूप देवा. न समजे कोणास

मुलगा – बाबा तुम्ही दही हंडी बघायला गेला होता ना
बाबा – हो बाळा गेलो होतो
मुलगा- बाबा, बाबा मग तुम्हाला श्रीकृष्ण दिसला.?, कसा होता तो,..? त्यानं हंडी फोडली का..?
बाबा – अरे हो हो बाळा किती प्रश्न करशील..
मुलगा – सांगा ना बाबा प्लिज तुम्हाला दिसला का कृष्ण
बाबा – हो बाळा दिसला ना
मुळगा- मग त्यानं हंडी फोडली का..? आणि बासरी पण वाजवली का
बाबा – हसत म्हणाले नाही बाळा त्यानं बासरी ही वाजवली नाही आणि हंडी ही फोडली नाही
मुलगा – बाबा तुम्ही माझ्याशी खोटं का बोलात मग तुम्हाला श्रीकृष्ण दिसला म्हणून
बाबा – हे बघ बाळा मला श्रीकृष्ण दिसला खरा, तो दूरवर उभा होता पण यावेळी त्याच्या हातात बासरी नव्हती, त्यांच्या हातात एक काठी होती. तो थांबवत होता सर्वांना थरावर थर लावू नका, जीवाशी आपल्या खेळू नका आणि गर्दी करून कोरोनाचा प्रसार करू नका पण कोणी ऐकायला तयार नव्हत त्याचं .
मुलगा – (थोड विचारात पडून)पण बाबा असकस ,श्रीकृष्ण असा थोडी असतो. त्याच्या हातात बासरी असते, बाजुला पशू- पाखरे असतात आणि सुंदर बासरीच्या मधुर आवाजाने सर्व मंत्रमुक्त होतात ना बाबा..?
बाबा – ते मुलाला हसत हसत उराशी घेतात आणि सांगतात , बाळा देव कुठल्या रूपात येईल काही सांगता येत नाही. यावेळी तो पोलिसांच्या रूपात आला होता. लोकांनी त्याला ओळखलच नाही.
मुलगा – बाबा पोलिसांच्या रूपात आणि तो ही काठी घेउन
बाबा – हो बाळा कारण आताच्या पिढीला गोड मधुर बासरीच्या भाषेत समजावल तर कळत नाही, म्हणुनच अशा पोलिसांच्या, डॉक्टरांच्या, सैनिकांच्या सफाई कामगारानच्या रूपात देवाला याव लागत जसं त्या युगात देवांना वेगवेगळ्या रूपात याव लागलं होत तसच.
मुलगा – खर आहे बाबा तुमच देव कुठल्या रूपात येईल काही सांगता येत नाही ,म्हणून मी उद्या हंडी फोडायला जाणारच नाही , मी घरीच छोटी हंडी फोडेन आणि सर्व आम्हाला मदत करणाऱ्या लोकांचा मान राखीन
बाबा – अरे… वा..!! शहाणा माझा बाळ …झोपा आता सकाळी लवकर उठायचं आहे ना…

  • अनिकेत शिंदे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular