स्वप्नं पाहिलं उघड डोळ्यांनी,
ध्येय मोठे जनजीवनाचा उद्धार,
रोवली मुहूर्तमेढ समर्पणाची,
घेऊनी हिंदूहृदयसम्राटांचा आशिर्वाद.
हाती घेतला भगवा झेंडा,
मनगटी बांधला दृढ आत्मविश्वास,
होऊनी नतमस्तक ग्रामदैवताला,
लक्ष साधिले माझ्या गावचा विकास.
सुरुवात केली शुन्यातून,
जरी नव्हती आपली सत्ता,
ओठी नामस्मरण पांडुरंगाचे,
मग कसा काय डगमगेल नवनिर्माणाचा निर्धार तो पक्का.
करत विचारपूस प्रत्येकाची,
नोंदून घेतल्या समस्या,
बांधूनी आराखडा निर्विकरणाचा,
शोधल्या पायखुणा प्रगतीच्या.
कर्म करीत निरंतर जाणुनी आपले कर्तव्य,
जिंकुनी मने जनमानसांची,
घडविला गावचा पहिला लोकनियुक्त सरपंच.
- रोहित उंडगे (आजरा , कोल्हापूर )
मुख्यसंपादक