Homeमुक्त- व्यासपीठया पुन्हा परतुनी !

या पुन्हा परतुनी !

बाबा,
प्राण फुंकुनी गेलात
मृतासम मनामनांत
अस्मिता चेतवत गेलात
सर्वहारा माणसामाणसात

उद्ध्वस्त करुन गेलात
भेदा – भेदीचे डोंगर
जिथेतिथे रचत गेलात
बंधुत्वावाचा महासंगर

जागोजागी रोखत गेलात
जुलूमाचा भयाण राक्षस
मानवतेचा पुकार करत
दिला भारताला बुध्दमाणूस

संविधान निर्मूण
तुम्ही केलीत महाक्रांती
पण, काळ टपून बसलाय
करण्यास अमानवी प्रतिक्रांती

http://linkmarathi.com/नाते/

बाबा,
तेव्हा परतुनी या
शब्द अन् कवितेतून
लेखणी अन् पुस्तकातून
मोर्चातून अन् आंदोलनातून
विधानसभा अन् लोकसभेतून
विद्यालयतून अन् न्यायालयातून

काळाचा डाव परतविण्यासाठी
बाबा, पुन्हा भारतभूवर परतुनी या !

प्रा. पूनम गायकवाड
B.A., M.A.(SOC), M.S.W., NET, M.PHIL., PH.D.(SCHOLAR)

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

नवोदित लेखक व कवींच्या सुद्धा इतरत्र प्रसिद्ध न झालेल्या कविता स्वीकारल्या जातील

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular