लष्करी गणवेशात माझे
प्राण त्यागीतो भारत माते
याहूणी तो आनंद कोणता मोठा?
प्राणप्रिया ही धरती आणि प्रीतीच्या
सहवासात ज्याने प्राण त्यागीला होता……
सोबती विर योद्धे,आणि होती अर्धांगीनी
समीप होती मायभूमी,कसा
अवचीत घातला घाव काळाने
दिली त्या महान विरांनी कुर्बानी
राहील अमर तुमची शौर्य कहानी…..
पेटत्या अग्नी ज्वाळेत
जय हिंदचा नारा घुमला
त्या वीरांचा जयघोष
साऱ्या पावन मातीत दुमदुमला….
ऐकताच ज्यांच नाव
शत्रूही थरकापला होता
विझला या भारत मातेचा दिपक
पण त्यांच्या आठवणीनं
आज या मातीचा कोणा कोणा
रडला होता..
वाहण्या तुझ श्रद्धांजली
घरां घरात दिपक पेटला होता…..
युग – युग सरतील
चंद्र सुर्यही गातील
अमर तुमची शोर्यकहानी
ज्या महान विरांनी भारत
मातेसाठी दिली कुर्बानी…..
-सौ.भाग्यश्री आपेगांवकर
मुख्यसंपादक