महात्मा फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि आजची स्त्री
२-महात्मा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक जबाबदारी…
“आज तिच्या प्रत्येक यशाच्या पावलाखाली ज्योती आणि भिमाची पाऊलखुण आहे….
त्यांच्यामुळेच मिळाला ताठ मानेनं जगण्याचा मान तिला,म्हणूनच आंबेडकर आणि फुलेंचा नारीला अभिमान आहे…..
शुद्रासमान जीनं होतं जीवनाचं आमच्या कोहिनूर बनलात…
लावून आमच्या स्वप्न आणि समानतेच्या हक्कांना घटनात्मक तरतुदीची झालर खरे पाठीराखे बनलात….
वाचल्या कित्येक अबला,नारी बनूनी शिक्षीत यशस्वी झाल्या…
केशवपन ,बहूपत्नीत्वाला विरोध तुम्ही केला….
फक्त चुल आणि मुल एव़ढच तिचं आयुष्य होतं…
पुरूषी अहंकार आणि हुकूमशाहीचं जोखड नेहमी तिच्या नशीबी होतं…
फक्त उपभोगाची होती वस्तू ती
अनिष्ठ चालीरूढी आणि परंपरांनी होती त्रस्त ती….
अचानक अंधारात पडली प्रकाशाची ठिणगी अन्
ज्योतीचा ऐसा उजेड पडला
बहुपत्नीत्व ,केशवपनला विरोध केला…
पुनर्विवाह घडवून आणला…
रोखण्या स्त्री भ्रूणहत्या सुरू केले बालहत्या प्रतिबंधकगृह ज्योतिबांनी…..
जेव्हा अस्पृश्यांवर करीत होता समाज अनन्वित अत्याचार गळ्यात मडके आणि कमरेला बांधून खराटा
उच्चवर्णीय करत हेते त्यांचे बेहाल…
तेव्हा उठला ज्योती घेवून ज्ञानाची मशाल….
“सर्व साक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्ती”…
धार्मिक व सामाजिक गुलामगिरी करण्या नष्ट ,केला सत्यशोधक समाज स्थापन्न…
स्त्री पुढे तो समाज पुढे असं बोलून गेले अंबेडकर देशाची घटना लिहून दिला माय बहिनींना,जनतेस बहुमान….
आज आंबेडकर आणि फुले तुमच्यामुळेेच तोडले आहेत साखळदंड
आणि त्या जुल्मी बेड्या
आज घेतेय ती मोकळा श्वास…
जगतेय ती ताठ मानेनं अभिमानानं”….
पूर्ण मानवजातीचं अस्तित्व आहे नारी…
पण कुठतरी खंत आहे उरी
अशिक्षित अजून ठेवल्या जाताएत पोरी…
दिवसा ढवळ्या आब्रूची तेडली जाताएत लक्तरे तिच्या कारण
तिचं संगोपन,संरक्षण,तिला न्याय देणारे कलम फक्त लिखितच राहिलेत,चार – पाच वर्षाच्या मुलींच्या अब्रूची लक्तरे तोडली जाताएत….
खऱ्याचं खोटं अन् खोट्याचं खरं
करायला लागलीत…
लाच खाऊन कायद्याच्या गैरवापर करायला लागलीत….
- सौ.भाग्यश्री आपेगांवकर
रा. आपेगांव
ता- अंबेजोगाई
जि- बीड
मुख्यसंपादक