मंगळसूत्र

तुझ्या नावाचं मंगळसूत्र ,
नाही ना माझ्या गळ्यात..
म्हणूनच का रे मला ,
हक्क नाही तुझ्या आयुष्यात…!!१!!

सतत तर असते मी सावलीसारखी ,
तुझ्याच आठवणीत…
घाल ना विश्वासाचा धागा ,
एक तरी माझ्या मनात…!!२!!

जगेल मी आयुष्यभर ,
तुझ्याच श्रावण झुल्यात…
वाटेलच कधीतरी तुला ,
ठेवावं मलाही तुझ्या छोट्याशा जगात…!!३!!

मंगळसूत्रानीच असते का रे ,
बाईच्या आयुष्याला महत्व…
त्यावर ठरवतो का समाज ,
तिच्या चारित्र्याचं अस्तित्व…!!४!!

मंगळसूत्र घालून तरी ,
जपलं जातं का तिचं मन…
कायद्यानी हक्क मिळतो ,
ओरबाडायला फक्त तिचं तन…!!५!!

हर्षा ज्ञा. गांजरे ( लोहे )
नागपूर…

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular