जयंती झाली थाटामधी,झाला गाजा-वाजा
पुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
स्वराज्याचं सुख आता मृगजळ झालं आहे,
षडरीपूच्या संकटाने समाजाला घेरलं आहे,
संकटालाही नमवणारा होता शिवबा राजा
पुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
शौर्याचा हा लढा साहस आमचं सांगून गेला,
नावामध्ये रमलो,डोक्यात घेणे राहून गेला,
आचरणातून शिवबा आम्ही केलाय बघा वजा,
पुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
माता माझी रोज इथे अत्याचाराने कुढत आहे,
हैवानांची कृत्ये बघा माणुसकी गाडत आहे
असे वाटते तुझ्या शासनातील द्यावी सजा,
पुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
बळीराजाची वेदना कवडी मोल झाली आहे,
भाव नाही मालास बेताची बारी आली आहे,
उपाशी बसलं घरदारं खचला हा बळीराजा,
पुन्हा ये तू रूप घेऊनि महाराष्ट्राच्या राजा!
-गौरव भंडारे
( साभार – साहित्य चावडी परिवार, विरार )
समन्वयक – पालघर जिल्हा