Homeघडामोडीआजरा तालुक्यात गव्याच्या हल्यात म्हैस जखमी

आजरा तालुक्यात गव्याच्या हल्यात म्हैस जखमी

आजरा (अमित गुरव) -: आजरा तालुक्यात वन्य गव्याचे हल्ले नित्याची बाब झाली असून अशीच घटना पुन्हा मुरुडे या गावी गोठ्यात बांधलेल्या म्हैशी बाबत घतली.
रामचंद्र पाटील यांनी शेतात गोठा बांधला आहे. गव्याने म्हैशीच्या
मानेच्या खालील बाजूस शिंग घुसवून जखमी केले.
वनपाल एस. के नीळकंठ व वनरक्षक यांनी घटनस्थळाला भेट देऊन पाहणी केली. सद्या उन्हाळ्यात अन्न आणि पाणी जंगलात फारसे उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राणी भटकंती करताना गावात येत आहेत . त्यांना जंगलातच चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्यात यावे त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी वेळोवेळी शेतकरी वर्गाने आंदोलनातून व्यक्त केली आहे.


शासकीय धोरणे ही वन्यप्राणी , शेतकऱ्याच्या पिकाशी , आणि मनुष्य यांच्या जीवाशी खेळ करत आहेत असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा आजरा तालुक्यातील लोक विचार करत आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular