उपजिल्हाधिकारी पद लोकसभेच्या तिकिटासाठी सोडले पण पक्ष…
वृत्तसंस्था -: राजकारणात मिळणारी प्रचंड प्रसिध्दी , पद आणि बरेच काही… या सर्वांचा मोह आवरत आवरत नाही असाच अनुभव कित्येत कलाकार , अभिनेते तसेच प्रशासकीय सेवेत रुजू असणाऱ्या अधिकाऱ्यांना ही येतो. काहींना अश्या संधी मिळाल्या आणि ते आमदार , खासदार तसेच मंत्री सुद्धा झाल्याचे आपण पाहतो.
निशा बांगरे या मध्यप्रदेश राज्यातील छत्रपुर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ( कमलनाथ ) काँग्रेस ने त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले . त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत क्रांग्रेस मद्ये प्रवेश केला . कमलनाथ यांनी दिलेला शब्द स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने व राजीनामा वेळेत स्वीकारला नसल्याने त्यांची संधी हुकली. मात्र लोकसभेला संधी मिळेल अशी आशा होती पण तीही आशा मावळली.
निशा बांगरे यांचे काँग्रेसवर आरोप
बांगरे यांनी काँगेसने माझी फसवणूक केल्याचा आरोप केला. कमलनाथ यांनी माझ्याशी संपर्क साधून मला तिकीट देण्याचे आश्वासन देत राजकारणात प्रवेश करा असे आश्वासन दिले. मला कोणतीही राजकीय पश्र्वभूमी नाही . संधी मिळाली तर राजकारणातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल त्यामुळे नाकारायला नको म्हणून काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र बेतुलमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना ही सुशिक्षित महिला राजकारणात येते याची भीती वाटल्याने त्यांनी विरोध करून मला तिकीट मिळण्यापासून दूर ठेवले.
एकवेळ स्पर्धा परीक्षा मद्ये यशस्वी होणे सोपे आहे पण राजकारणात नाही
बांगरे यांना तिकीट मिळाले नाही पण काँग्रेसने नंतर प्रवक्ते पदावर नियुक्त केले होते पण लोकसभेत ही तिकीट नाही त्यामुळे त्या आपली नोकरी परत मिळवण्याची धडपड करत आहेत. एकवेळ स्पर्धा परीक्षा मद्ये यशस्वी होणे सोपे आहे पण राजकारणात नाही असे मत त्यांनी व्यक्त केले
मुख्यसंपादक