Homeक्राईमअभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घराबाहेर गोळीबार

अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घराबाहेर गोळीबार

सलमान खान ( Salman Khan) यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ माजली होती. बाईक (Bike ) वरून दोघे जन आले आणि गोळीबार केल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी सीसीटिव्ही माध्यमातून शोध घेत आहेत.
सलमान खान यांना अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यात आज पहाटे सलमान खान घरीच होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये (salman khan fan’s) चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गोळीबाराच्या २-३ राऊंड फायर झाले असले तरी कोणतेही जीवित हानी किंवा कोणी जखमी झाले नाही . खान यांच्या वांद्रे येथील गलॅक्सी निवासाबहेर (Galaxy Nivas ) पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि त्यांच्या सुरक्षितेत वाठ केली आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular