Homeघडामोडीआंबेओहोळ पुनर्वसनाच्या बैठका म्हणजे लोकप्रतिनिधींचा टाइमपास - कॉ. गुरव

आंबेओहोळ पुनर्वसनाच्या बैठका म्हणजे लोकप्रतिनिधींचा टाइमपास – कॉ. गुरव

आजरा(हसन तकीलदार ) -आंबेओहोळ हा धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे. आंबेओहोळ धरणग्रस्तांची गेली 25 वर्षे कुचेष्ठा चालवली आहे प्रश्न गांभीर्याने न घेता लोक भेटण्यासाठी येतात म्हणून बैठका घ्यायच्या अधिकाऱ्यांचा आढावा ऐकून घ्यायचा आणि प्रत्येक वेळी प्रश्न तेच चर्चा तीच मात्र प्रगती काहीच नाही. प्रत्यक्ष ज्यांचे पुनर्वसन बाकी आहे त्यांच्याशी किंवा संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता ज्यांना पुनर्वसनाचे प्रश्न माहीत नाहीत ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते बैठकीला बसून आज पर्यंत 100 पेक्षा जास्त बैठका घेतल्याचे सांगून पुन्हा पुन्हा बैठक घेऊन वेळकाढूपणा करणे एवढेच होत आहे. वास्तविक संकलन दुरुस्ती सारखे प्रश्न स्थानिक जिल्हा पातळीवर आहेत, काही शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पण त्यांच्या सातबारावर चुकीच्या पद्धतीने बोजा चढवला आहे याला पुनर्वसन म्हणायचे का? करार होऊन २ ते ३ वर्षे पूर्ण झाली तरी देखील काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना जमीनी मिळालेल्या आहेत पण घर बांधणीचे भूखंड मिळालेले नाहीत. जमीन संपादन करण्याचे बरेच प्रश्न शिल्लक असताना मुश्रीफ साहेबांचे नेहमीचे आश्वासन ते म्हणजे “शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही”.


या अगोदरचे पेपरच्या बातमीचे कात्रण पाहिल्यास पूर्वीचे आश्वासन होतं ते म्हणजे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत घळभरणी करणार नाही.सुरुवातीच्या काळात मा. बाबासाहेब कुपेकर देखील असेच म्हणत होते असा आरोप करीत कॉ. शिवाजी गुरव म्हणाले की, गेली 25 वर्षे शेतकरी पुनर्वसनाची चातकाप्रमाणे वाट पाहतो आहे अधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र बैठका घेऊन नुसता टाईमपास करत आहेत. असेच होत गेल्यास अजून दहा ते पंधरा वर्षे पुनर्वसन होईल असे वाटत नाही. मंत्री मुश्रीफ साहेबांनी लोकांची कुचेष्टा थांबवून गांभीर्याने घ्यावे व पुनर्वसन करावे. धरणग्रस्तांची एक पिढी मागे पडली आहे. अजून जास्त वेळ घेऊ नये कॉ. शिवाजी गुरव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


पुढे ते म्हणतात की, मतदारसंघ बदलण्याची मुश्रीफ साहेब वाट पाहत आहेत की काय अशी भावना प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. कृपया सत्य मांडणी करत आहे वाईट वाटून घेऊ नये, धरणग्रस्तांचे पुनर्वसन लवकर करावे एवढीच अपेक्षा आहे. असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿

तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

   🎙️ Follow Us 🎙️

You Tube चॅनेल लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS

व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular