घडामोडी
आजरा नगरपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन प्रक्रियेत दिरंगाई; अन्याय निवारण समितीची तहसीलदारांकडे तातडीची मागणी
अमित गुरव
आजरा ( अमित गुरव ) -: आजरा नगरपंचायत निवडणूक २०२५–२०२९ साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अधिकृत प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आज तहसीलदारांकडे लिखित निवेदन सादर केले.
ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे उमेदवार त्रस्त
समितीने दिलेल्या माहितीप्रमाणे—
नामनिर्देशनाच्या ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळाचा सर्व्हर...
उत्तूर ( प्रतिनिधी ) - उतूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल तडका चे मालक आणि तरुण व्यावसायिक प्रमोद नामदेव महाजन (वय ३२) यांनी घरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना सोमवार, दि. १० जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास प्रमोद यांचा त्यांच्या आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. वादानंतर संतापाच्या भरात...
लिंक मराठी – विशेष प्रतिनिधीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा “पैसा” हा घटक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. समाजातील कार्यकर्ते, प्रामाणिक उमेदवार यांना मतदारांचा आधार न मिळता केवळ पैशांचा मारा करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा मिळत असल्याची खंत जनतेतून व्यक्त होत आहे.
निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात
अनेक ठिकाणी निवडणुकीत पैसा खर्च...
आजरा(हसन तकीलदार): - वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर विविध ऊसजातीच्या ऊसाची लागण करण्यात आली आहे. या ऊसाच्या तुऱ्यांचे निरीक्षण व परीक्षण करून त्या तुऱ्यांच्यामधून बिजाण्ड घेऊन त्यांचे संकर करणार आहे. लागण केलेल्या या उसांची पाहणी करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे महासंचालक संभाजी कडू पाटील व इतर सहकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी प्रयोग यशस्वी होत असलेबद्दल त्यांनी...
आजरा( प्रतिनिधी ):-आजरा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेले छोटेसे गाव किटवडे. पावसाळ्याबरोबर अवकाळी पावसानेही झोडपले, त्यात मजुरांची टंचाई त्यामुळे हातातोंडाला आलेल्या भात कापणी आणि मळणीसाठी ग्रामीण भागात सुगीची धांदल सुरु झाली आहे. शेतकरी सद्या यांत्रिकीकरणाचा जास्त वापर करीत असून अशा काळात कोरीवडे येथील युवा शेतकरी धनाजी देसाई यांनी आपल्या शेतातील भाताच्या मळणीसाठी चक्क थार गाडीचा वापर केल्याने सोशल मीडियावर याची...
दिल्लीच्या हृदयस्थानी, लाल किल्ल्यासारख्या अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक वारशाजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाने देशाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी आणि आसपासच्या वाहनांना लागलेली आग—या सर्वांनी राजधानी हादरली आहे.
घटना कशी घडली?
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या समोर, गेट नं. १ जवळ हुंडई i20 कार अचानक स्फोटाने उडाली. गर्दीची वेळ, रस्त्यावर वाहतुकीची मोठी हालचाल आणि पर्यटकांची...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची निवडणूक जवळ येईल तशी भावी नगरसेवकांची भाऊ गर्दी वाढतच चाललीय. सोशल मीडियावर प्रत्येक इच्छुक आपल्या वॉर्डात मीच अशा आशयाची स्टेट्स आणि वॉट्सअपला प्रचार प्रसार सुरु केला आहे आणि आघाडीमध्ये आपलं स्थान पक्के करण्यासाठी धडपड सुरु केली आहे. परंतु तालुक्याला लाभलेल्या दोन्ही नामदारांनी मात्र अजूनही मौन पाळलेले दिसते. दोन्ही नामदारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असल्याने कार्यकर्त्यांची मात्र तडफड...
आजरा(हसन तकीलदार):- बुरुडे ता. आजरा येथे मुख्याध्यापकांची बदली झालेबद्दल निरोप समारंभ व विविध पदावर नियुक्ती झालेल्यांचा जाहीर सत्कार समारंभ नुकताच बुरुडे येथील ग्रामदैवत दत्त मंदिर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत सावंत होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर. पी. आय. (गवई)पक्षाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांनी केले.
विद्यामंदिर बुरुडेचे मुख्याध्यापक मायकल फर्नांडिस यांची बदली सोहळे येथे झालेबद्दल माजी विस्तार अधिकारी शशिकांत...
घडामोडी
शरद पवार यांचे आवाहन: “मूळ ओबीसींना प्राधान्य द्या!” — कोल्हापूरमध्येही मोठा प्रश्नचिन्ह
अमित गुरव
अमित गुरव -: मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी समाजाला प्राधान्य द्यावे असा स्पष्ट संदेश दिला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील असून मूळ ओबीसींच्या प्रमाणावर उमेदवारी द्यावी, अन्यथा पक्षाच्या भूमिकेला धक्का लागेल, असा पवारांनी इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी...
आजरा(हसन तकीलदार):- वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने व्यंकटराव शिक्षण संकुलात अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही.देसाई यांची प्रेरणा तसेच कलाशिक्षक कृष्णा दावणे व एन.सी.सी. ऑफिसर महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षकांच्या मदतीने प्रशालेच्या मैदानात इयत्ता पहिली ते सातवी...










