Home Blog Page 19
न्युज नेटवर्क -: सोशल मीडिया प्रतिबंध नेपाळ सरकारने सरकारी नोंदणीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे फेसबुक, X, यूट्यूब आणि इतर 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली . TikTok, Viber आणि इतर काही अ‍ॅप्सना नियमांचे पालन करून काम करण्यास परवानगी दिली गेली . 'Gen Z' आंदोलन आणि हिंसक घटना युवा वर्गाने या डिजिटल बंदी विरोधात व्यापक आंदोलन राबवले. या आंदोलनात सत्ताधारी प्रणालीवरील भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध...
आजरा (हसन तकीलदार) :-ईद -ए -मिलाद निमित्त आजऱ्यातील विधायक कार्य करणाऱ्या राहत खिदमत फाउंडेशनतर्फे ग्रामीण रुग्णालय आजरा येथील दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. ईद -ए -मिलाद या...
अमित गुरव ( कोल्हापूर ) -: पाश्र्वभूमी: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला OBC (इतर मागासवर्ग) कॅटेगरीत समाविष्ट करण्याचा आराखडा (GR) जारी केल्यावर, OBC समाजात तीव्र विरोध निर्माण झाला आहे. हा निर्णय Kunbi जातीतील प्रमाणपत्राद्वारे मराठांनाही OBC दर्जा मिळतो, अशा स्वरूपाचा असल्याने ओबीसी समाज 'आरक्षणाचा वाटा कमीत-कमी होईल' असा भितीने भरला आहे . आंदोलनाची रूपरेषा: मोर्चा व उपोषण: मनोज जरांगे यांच्या लढ्याचा प्रभाव वाढल्यानंतर...
आजरा तालुक्यातील भादवण येथील रहिवासी श्री. सागर आप्पा गोरे यांच्या मातोश्री व व्यावसायिक श्री. आप्पा गोरे यांच्या पत्नी कै. लिलाबाई आप्पा गोरे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भादवण ग्रामस्थ तसेच मुंबईतील सर्व गावकरी परिवार शोकाकुल झाला आहे. गावातील सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग नेहमीच महत्त्वाचा राहिला होता. कै. लिलाबाई गोरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच...
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व नसून समाजाच्या आरोग्याबाबतही सजगता निर्माण करण्याची एक मोठी संधी आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, आजरा यांच्या वतीने “श्री गणेशा आरोग्याच्या आरोग्य अभियान” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत गणेशोत्सव काळात गावोगावी सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यात रक्तदाब, रक्तशर्करा, वजन,...
आजरा (हसन तकीलदार):-आजपर्यंत आजरा अन्याय निवारण समितीने प्रत्येक गल्लीबोळातील,प्रत्येक वॉर्डातील आणि प्रत्येक कॉलनीतील मूलभूत प्रश्नांना वाचा फोडीत सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा व प्रश्नासाठी निरपेक्षपणे लढा दिलेला आहे. या सर्व कामांची दखल घेत तसेच समाजाभीमुख केलेल्या प्रश्नांचा निपटारा यासाठी सुभाष चौक गणेश मंडळातर्फे आजरा अन्याय निवारण समितीचा यथोचित सत्कार करण्यात आला. आजरा अन्याय निवारण समितीचे कार्य सर्वश्रुत आहे. पाचपट वाढलेला घरफळा...
आजरा(हसन तकीलदार): तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या मार्फत “श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमेअंतर्गत विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरांमध्ये नागरिकांना आधार व गोल्डन कार्ड नोंदणी, नेत्रदान व अवयव दान जनजागृती, तसेच कुष्ठरोग, क्षयरोग, जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून सल्ला व उपचार उपलब्ध करून...
आजरा(हसन तकीलदार) : येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व आपल्या आजरा तालुक्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, देशातील तीन शिक्षण तज्ञापैकी एक महान शिक्षण तज्ज्ञ डॉ. जे. पी.नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एम. एम.नागुर्डेकर व...
आजरा (हसन तकीलदार):-आजरा शिवसेना (उबाठा )व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज यांचे संयुक्त विद्यमाने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात भव्य तबला व मृदंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खास गणेशोत्सवानिमित्य या स्पर्धेचे आयोजन करून भारतीय परंपरेला जपण्याचे काम शिवसेना उबाठाने केले आहे. या स्पर्धेच्या उदघाटनासाठी तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती हे विशेष होते. कोणत्याही चांगल्या आणि सामाजिक...
आजरा (प्रतिनिधी) :श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हरपवडे या विभागात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचा उत्साहपूर्ण माहोल पाहायला मिळाला. गतवर्षी वंदनीय छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने उभारण्यात आलेल्या या ध्वजस्तंभाने गावागावांत शिवकालीन इतिहासाची प्रेरणा देत असंख्य शिवभक्त, युवक आणि समाज घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. 📌 सोहळ्यातील प्रमुख क्षणया सोहळ्यात पुन्हा एकदा शौर्य, पराक्रम, संस्कार आणि संघटन यांचा जागर करण्यात आला. मा. तुकाराम...