झुंज : भाग ८ -
किल्लेदार नेहमीप्रमाणे जय्यत तयारीनिशी तटावर हजर होता. खानच्या सैन्यात वाढलेली हालचाल त्याला काहीसे व्यथित करत होती. कारण त्याचा अर्थ होता की नवीन तयारीनिशी खान परत किल्ल्यावर आक्रमण करणार. आता पर्यंत जरी त्याचे मनसुबे सफल झालेले नसले तरी युद्धामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नव्हते. त्यामुळेच जराही गाफील राहणे किल्लेदाराला मंजूर नव्हते. दोन घटका होऊनही...
कविवर्य महानोर दादा यांच्या धर्मपत्नी सुलोचनाताई महानोर यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याचं समजलं आणि मनपाखरू बेचैन झालं डोळ्यासमोर पळसखेड च्या मळ्यातल वैभव आल ,तो नुसता पानाफुलांचा फळांचा मळा नव्हता ,तो मळा होता माणुसकीचा, शब्दांचा कवितेचा ,आणि येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व अतिथींच्या आदरातिथ्याचा. असा हा आंतरिक भावनांचा मळा आज बाईंच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं पोरका झाला , दादांनी पुस्तकाची अर्पण पत्रिकेमध्ये लिहून ठेवलंय की...
अहमदनगर शहरात नुकतीच एक घटना घडली. त्या घटनेने सर्वांना विचार करायला लावला. कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलीची हत्या करत पती-पत्नीने आत्महत्या केली. त्या चिमुकलीला फुलायच्या अगोदरच मारून टाकले. थोडीशीही सद्सद्विवेक बुद्धी जागी कशी झाली नाही ? नंतर दोघा पती पत्नी यांनी आत्महत्या केली. खरचं जीव इतका नकोसा होतो का ? आपल्या आसपास, वर्तमानपत्रात, टीव्हीवर आपण आत्महत्येच्या बातम्या ऐकतो. अगदी गरिबांपासून तर...
झुंज : भाग ७गनीम तर अगदी तयारीने पुढे येत होता. परत एकदा अल्लाहू अकबरचा स्वर गगन भेदत जवळजवळ येत होता. यावर काहीतरी उपाय लवकरात लवकर करणे किल्लेदाराला गरजेचे होते आणि त्याचे डोळे चमकले. त्याने लगेचच आपल्या लोकांना आवाज दिला. अनेक उमदे तरुण त्याच्यापुढे हजर झाले.
“जी किल्लेदार…!” त्यातील एकाने आदबीने विचारले.
“आपले पोरं हाय नव्हं, त्यास्नी बोलवा.” किल्लेदाराने आज्ञा केली आणि...
झुंज : भाग ६
खान यावेळेस मात्र कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसेच तो कोणत्याही परिस्थितीत किल्लेदाराला हलक्यात घेणार नव्हता. तसेही जो किल्लेदार आपल्या माणसांना साधी जखमही होऊ न देता एक हजाराची फौज परतवून लावू शकतो त्याच्या कल्पकतेला दाद देणे खानाला क्रमप्राप्तच होते. हाच विचार करत गेल्या १५ दिवसांपासून खान नीट झोपू देखील शकला नव्हता.
“हुजूर…” द्वारपालाचा आवाज आला आणि खानाची...
दरवर्षी कधी पावसाविना तर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होतं ज्यावेळेस शेतीला पूर्णपणे खर्च लागलेला असतो त्या वेळेसच हा निसर्गाचा प्रकोप होऊन बळीराजाचं प्रचंड नुकसान होतं हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो आणि हातबल झालेला कर्जबाजारी झालेला कष्ट करून पार थकलेला शेतकरी भुईसपाट होतो किलकिल्या डोळ्यांनी मायबाप सरकार कडे पहात राहतो कुठे आमदार आणि खासदार येईल अधिकारी येईल आपल्या...
माझ्या बापानं विष घेतलं मित्राउद्या तुझाही बाप फासी घेईलएक एक करून आपल्या
कष्टकरी कुळाचा नाश होईल
आज माझ्या दारातून उठली तिरडीउद्या तुझाही दारातून उठेलआम्ही पडलो उघड्यावर
तुही रस्त्यावर येशील
काळ जरा अवघड आहेकरू नकोस भूलज्यांच्या साठी पेटलो आपण
त्यांनीच विझवली चुल
तु चुकतोय मित्राजसा मीही चुकलो होतोबापाच्या मारेकर्यांचे झेंडेखांद्यावर घेऊन नाचलो होतो
...
: झुंज : भाग ५ -
खानाच्या तंबूत त्याच्या सह एकूण ६ जण मसलत करत होते. किल्लेदाराकडून आलेला निरोप खानाच्या अगदी जिव्हारी लागला होता. युद्ध तर अटळ होते. पण इतक्या दिवसात खानाला मराठ्यांच्या युद्धकलेची चांगलीच ओळख झालेली होती. आणि त्यामुळेच तो प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करत होता. तसे पाहिले तर एका नजरेत भरणारा किल्ला घ्यायला कितीसा वेळ लागणार? त्यातून त्याच्या आजूबाजूला...
झुंज : भाग ४ -
राजांचा खलिता मिळून जवळपास आठ दिवस झाले होते. शहाबुद्दीन खान येताना शक्य होईल तितकी धार्मिक स्थळे उध्वस्त करत येत होता. त्याबरोबरच गरीब जनतेचे धर्मांतर करण्यास त्याने सुरुवात केली होती. जे लोक आपला धर्म सोडत नव्हते त्यांच्यावर अनन्वित अत्याचार चालू झाले होते. त्याच्या या कामात कित्येक हिंदू सरदारही बादशहाचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्याला मदत...
जीवन कसेही असो.मग ते व्यस्त किंवा हाती मोकळा वेळ असलेले. कामाचा आवाका हा नेहमी कमी-जास्त होत असतोच.आणि आपणही या वर्तुळात गोलाकार आपल्या इच्छा-आकांक्षाच्या याद्या घेऊन फिरत असतो.आणि म्हणूनच मला जीवन ही सरिता निरंतर प्रवाहित प्रक्रिया वाटते.जी वाट गवसेल तशी मार्गस्थ असते.कधी वेगावर स्वार होऊन तर कधी नि:शब्द लय पकडत संथ तर कधी आवेगाने तुटून पडणारी. हा अखंड प्रवास सतत...