Home Blog Page 265
जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 5 जून पर्यावरण दिन साजरा केला जातो. यामागील मुख्य उद्देश म्हणजे,जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे. संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. हा नैसर्गिक परिसर म्हणजे जमीन, हवा, पाणी, झाडे ,नदी, डोंगर जीवसृष्टी हे सर्व. पण हे आज कोठे सुरक्षित आहे ? ध्वनी प्रदूषण,...
कोल्हापूर, : गडहिंग्लज अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी कोणतीही आणि कसलीही चिंता करू नये, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आपण या बँकेच्या मागे हिमालयसारखा उभा आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे, सत्तर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बँकेमध्ये मार्च २०२० साली गुंतवणूक समितीची मान्यता न घेताच बँकेच्या जनरल मॅनेजरने १३ कोटी रुपये फंडामध्ये...
बीड पासुन 120 किलोमीटर अंतरावर व नगरपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेलं. आष्टी तालुक्यातील माझं गाव श्रीक्षेत्र वाहिरा. तिन्ही बाजूंनी टेकडी व मध्यभागी गाव. ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख. श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही वाहिरा भूमी.वाहिरे ग्राम संभूतं अविंध कुल भास्करम् l योगसंग्राम निर्माता तं नमामि महंमदम्ll संत शेख महंमद महाराज यांनी...
आज आपण भारतात काही भागात पेट्रोल ने शतक पूर्ण केले किंवा त्या मार्गावर असल्याचे पाहतो. या शतका मुळे कोणाला आनंद झाला असेल तर विरळच..पण आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत की त्यामुळे तुम्हाला धक्काच बसेल . कारण जगभरात असे काही देश आहेत जे इतक्या कमी किमतीत पेट्रोल मिळते की त्यांना भारतात आल्यावर पाण्याची बाटली सुद्धा महाग वाटेल.सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएला...
दिनकर उगवला, पुन्हा आज मावळला.सृष्टीचक्र चाले नित्य,कधी कळले का तुला ? लक्ष लक्ष प्राणी पक्षी,कोण चारापाणी देतो ?नियतीचा खेळ गड्या,सांगा कोणाला कळतो ? जन्म-मृत्यूचे हे कोडे,सांगा कुणाला सुटले ?देई प्रयत्न सोडून,म्हणे नशीब फुटले …. नकळत होते प्रेम,ताबा सुटतो मनाचाभावना या अनावर,क्षण त्याचा आनंदाचा… चाले गाडी जीवनाची,सरे क्षण कणकणनकळत घडे सारे, स्वीकारते माझे मन… चाले चक्र निरंतर , नकळत घडे सारेशक्य तेवढे जाणावे , अज्ञानात...
पु.ल.नेहमी म्हणायचे ,जवळजवळ निम्मा महाराष्ट्र 1 जून ला जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे… सर्व कष्ट आणि कटकटीमधून वेळ मिळाल्यावर मुलाला गावातील मराठी शाळेत हात धरून पायी चालत घेऊन जाउन शाळेत गुरूजी समोर उभे केल्यानंतर शाळाप्रवेश होई मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी वय वर्ष ६ पूर्ण असावे लागते त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरवून जन्म तारीख अशी टाकायची...
नवी दिल्ली (प्रतिनिधी )- भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबधित जे नवीन नियम दिलेत ते आम्हाला लागू होत नाहीत. त्यासाठी त्यांनी आम्ही केवळ सर्च इंजिन म्हणून काम करतो असे कारण देत गुगलने आपली भूमिका दिल्ली हाय कोर्टात स्पष्ट केली. हे केंद्र सरकारचे नियम फक्त सोशल मीडिया...
अहो जग पुढे गेले,हाक ऐकू येते कानीजर एवढी प्रगती,हतबल कोरोनानी…. विकासाचा बोलबाला,वृक्षतोड भयंकरसमतोल ढासळला,निसर्गाचा हा कहर…. उंच उंच इमारती,जीवघेणी झाली स्पर्धाहरवली माणुसकी,प्रेम कुठे आहे मर्दा ? .. झाला संपर्क जगाशी,मोबाईल हाती आलास्वास्थ्य हरवले त्याचे, विश्वासाला तडा गेला.. अहो जग पुढे गेले,धावायला सांगे त्यालाएक क्षण ठरलेला,तुझ्या आठव मृत्यूला…. कशासाठी पळायचे?,त्याचे उत्तर शोधावेजरी गेले पुढे जग,तुझे आयुष्य जगावे…. - कवी - किसन आटोळे सर
केनियाने भारताला 12 टन धान्य मदत म्हणून पाठवले. बरेच भारतीय ह्या छोट्याश्या मदतीची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तरएक छोटीशी कथा ऐका.. तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील...
किशोर सोड त्याला, तू ऐकणार नाही आहेस का माझं, सोड त्याला…."मी म्हणतेय सोड त्याला" नाही शेवंती याला आज मी जिवंत सोडणार नाही, जे काय पुढे व्हायचं ते होईल…..हा आज इथून निसटला ना तर उद्या पुन्हा त्रास देईल, म्हणून अशा लोकांना त्याचवेळी तिथेच सरळ केलं पाहिजे…… जाऊदे ना किशोर सोड त्याला….. अगदी मरगळीस येऊन शेवंती खाली पडतच किशोरला म्हणाली आणि किशोर ने त्या...