Home Blog Page 274
माझ्या माहेरच्या घराला दोन गॅलऱ्या होत्या. त्यातल्या मागच्या गॅलरीत उभे राहिले की समोर शेजारच्या बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये लावलेली गुलमोहराची तीन झाडे दिसायची.कधीही कंटाळा आला किंवा थोडेसे डिप्रेस्ड वाटत असले की मी त्या गॅलरीत गुलमोहोराकडे पहात उभी रहायचे.भरपूर हिरवीगार, सळसळणारी पाने.. अनेक पक्षांचा मुक्त वावर, त्यांचा किलबिलाट.. अन्न शोधायची किंवा इतर कसलीतरी अनाकलनीय लगबग.. हे पहात असताना मन आपोआप शांत...
माझ्या साठी बाप माझा सारी रात्र जगायचा.उपाशीपोटी बाप माझा शेता मध्ये राबायचा. दुःखाचे ते जीवन होतेकधी रुसायची मूलमुलांसाठी भाकर नाहीस्वतःचे व्हायचे हालमुलांसाठी भाकर देऊन, स्वतः पाणी पिऊन निजायचा. उपाशीपोटी बाप माझा शेता मध्ये राबायचा…… घाम गाळून काम तो शेतामध्ये करायचा.मुलांच्या आयुष्यासाठी रात्रंदिवस झुरायचा.पाऊस असो या ऊन कधीच नाही थांबायचा. उपाशीपोटी बाप माझा शेता मध्ये राबायचा…… रात्र असो या दिवसमुलांच्या स्वप्नाकडे बघून चालायचादुःख आज आहेतर...
हरपली संवेदना,माणुसकी दुरावलीजन्म माणसाचा तरी,जनावरं कशी झाली. जनावर तरी बरी, घात न करी कुळाचाकिती झाले बलात्कार,सांग तू कोण्या जातीचा. म्हणे माणूस स्वतःला,सांग माणुसकीचे गुणभ्रष्टाचार करून तू,दाखवतोस अवगुण. चोर लुटेरे माणसचं ना,माणूस अन्याय अत्याचारीमुलगी नको म्हणून,सांगा गर्भपात कोण करी. असतील चांगली माणसं, बोटावर मोजण्याएवढीतुम्हीच सांगा वाचकांनो,माणुसकी शिल्लक केवढी. गरजूंच्या मदतीला,सांगा तुम्ही किती जातादुरावलेली माणुसकी,जवळ येईल का आता. माणूस मनाने दुरावला होता,आता शरीरानेही दुरावलाया संकटातून तरी शिक,यामुळे...
औंध (प्रतिनिधी ) - श्री मूळपीठ यमाई देवी औंध जिल्हा सातारा एक प्रख्यात शक्तीपिठ.पाच दिवस साजरा होणारा चैत्री उत्सव. सालाबाद प्रमाणे साजरा होणारा चैत्री उत्सव, चैत्र पौर्णिमेनंतर चैत्र कृष्ण १ ते पंचमी असा पाच दिवसाचा. हा चैत्री आज उत्सव संपन्न झाला .चैत्र उत्सवाचा महिना.चैत्र महिना हा उत्सवाचा महिना !जयंती सणांचा मास आहे विविध धर्मातील महत्वाचे सण, जयंती या महिन्यात...
प्रतिकचे लग्न होऊन नुकतेच २- ४ महिने झाले होते. नेहमी स्मित हास्य करणारा प्रतिक आता काय बायको आली आहे घरी म्हणजे ऑफिसमधून लवकरच येत असणार असे म्हंटले की गोड हसायचा. नवदाम्पत्य दोघेही आनंदात होते. प्रतिकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याची आई देखील सकाळ -संध्याकाळ देवाचे आभार व्यक्त करण्यासाठी देवघरात देवपूजा अथवा नामस्मरण करण्यात व्यस्त...
आम्हाला खात्री होती की, या इंजेक्शनमुळे आपला भाई लवकर बरा होईल. त्याच्या मुलीला मी सांगितले की, "तू घाबरु आणि टेन्शन सुद्धा घेऊ नको. तू आता जी धावपळ करत आहेस त्यावरून भाईची मुलगी बनून नाही तर मुलगा बनून काम करत आहेस. भाई...
कोरोना विषाणू / महाभयंकर/कापे थरथर/ नर नारी//1// वेगी पसरतो/ नाकी तोंडी जातो /फुफ्फुस घेरतो / घातकच //2// कित्येक घायाळ / प्राणही घेतले /संकट हे आले / कोरोनाचे //3// मुखी लावा मास्क / सॅनिटायझर /नियमित कर / धू मानवा //4// गर्दी तुम्ही टाळा / नियम हे पाळा /ऐक माझे बाळा / कृष्णा सांगे //5// कवी - किसन आटोळे आष्टा ( बीड )
( प्रतिनिधी ) : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र एन जी ओ समिती ( महाराष्ट्र राज्य ) च्या झूम मीटिंग ऑनलाईन कार्यकारिणी बैठकीत युवराज रामचंद्र येडुरे यांची राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली . ते शेणगाव येथील स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापंक अध्यक्ष आहेत . सामाजिक क्षेञात गेली बारा वर्ष कार्यरत आहेत. तसचे गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र एनजीओ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा...
१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा का करतात ? काय आहे या दिवसाचा इतिहास ??१ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.१ मे ला महाराष्ट्र दिन...
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण...