Home Blog Page 275
खुळूक् खुळ्ळूक असा घुंगरांचा आवाज आला की शेतकऱ्याला बैलगाडी आठवते, एखाद्या गुलहौशी माणसाला लावणी आठवते आणि आम्हा शहरवासियांना रसवंती गृह आठवते!!!भर दुपारी किंवा उन्हे उतरत्या संध्याकाळी घशाला कोरड पडलेली असताना जर हा घुंगरांचा आवाज ऐकू आला तर आपले पाय आपसूक त्या दिशेने वळतात आणि आपण त्या रसवंती गृहाजवळ जाऊन पोहोचतो.ते सतत फिरणारे यंत्र, काचेच्या ग्लासांचा खणखणाट,रस गाळणारा एखादा दादा...
देवाची करणी आपला निसर्ग म्हणजे अनेक प्रकारच्या चमत्कारांचे आगरच आहे जणू. निसर्गातील अनेक गोष्टींचे निरिक्षण केले की आपल्या ज्ञानात भर पडत राहाते. यातील एक चमत्कार म्हणजे आपला नारळ! इतक्या कठीण कवचाच्या आत इतके मृदू खोबरे आणि मधूर पाणी असते याचा ज्या मानवाला पहिल्यांदा शोध लागला असेल त्याला किती नवल वाटले असेल नाही!नारळाचे झाड हे जर कल्पवृक्ष मानले तर नारळपाणी म्हणजे...
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले हे समजण्यासाठी बाहेरचे तापमान वाढायच्या आधीच टिव्हीवर कोल्ड्रिंक्स, अमूललस्सी वगैरेंच्या जाहिराती सुरू होतात मग हळूहळू उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते.मागच्यावेळी मी लिंबूसरबता विषयी लिहिले होते. त्या सारखेच किंबहुना मला त्यापेक्षाही आवडणारे घरगुती सरबत म्हणजे कोकम सरबत . अतिशय आल्हाददायक रंग असलेली आणि त्यापेक्षाही उत्तम चव असणारी या फळांची झाडे कोकण परिसरात मुबलक प्रमाणात दिसतात. काजू,...
लस्सी जैसी कोई नही. काही दिवसांपूर्वी एक कविता वाचनात आली. लस्सी ते चा असे त्या कवितेचे नाव होते. कवी अन्वर मसूद यांनी पंजाबीत लिहिलेली ही कविता व तिचे हिंदी रुपांतर पहाण्यात आले.कवितेत लस्सी आणि चहा यापैकी कोण जास्त बरे आहे असा विवाद लस्सी आणि चहामध्ये झालेला दाखवला आहे. शेवटी ते दुधाला विचारतात की त्यांच्यात जास्त उपयोगी कोण? दुध त्यांचा निवाडा...
सध्या गुगलबाई गुगलबाई सांगतेस का ग? हा खेळ सुरू आहे. हा खेळ खेळताना एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे असे काहीतरी पहात राहिले जाते. त्यात भोजनकुतूहल नावाच्या ग्रंथावरची लेखमाला दिसली. कुतुहलापोटी मी पण भराभर वाचली.तंजावर येथील एकोजीराजे यांच्या पत्नी दीपाबाई यांनी रघुनाथ पंत नवास्थे या महाराष्ट्रातून तिथे पोचलेल्या पंडिताकडून हा ग्रंथ लिहून घेतला.हा ग्रंथ संस्कृतमधून श्लोक स्वरूपात लिहिलेला असला तरी त्यात...
पूर्वी ऋतू बदलाची चाहूल निसर्गातून मिळायची. पावसाआधी येणाऱ्या काळ्या मुंग्या, पाऊस जाताना भिरभिरणारे चतूर नावाचे किटक पानगळ वगैरे वगैरे आताशा टिव्हीवरच्या जाहिराती ऋतू बदलत असल्याचे जाणवून देतात.व्हॅसलिन, बोरोलिन वगैरे गुबलीगुबली गुश म्हणून थंडीचे स्वागत करतात तर कतरिना, शाहरुख, ऋतिक इत्यादी थंड पेये प्यायला लागले की अरेच्चा उन्हाळा आला वाटतं (तशी मुंबईत थंडी पण सर्दीमें भी गरमी का एहसासच देत...
सायंकाळी दोघे भांडलेतो तिच्यासोबत खूप तंडलाती त्याच्यावर खेकसलीतो ही तिच्यावर ओरडलातो रागात बाहेर गेलाती घरातल्या घरात कुढत व्हतीआसू दिसत नसले तरीमनातल्या मनात रडत व्हती तो उशिरा घरी आलाथेट स्वयंपाक घरात घुसलाअन जेवायला बसलाऊन ऊन भाकर आनपरातीतली हरभऱ्याची भाजीखाता खाता तिची स्तुतीकरू लागलासवयीप्रमाणे…..! तिची पण कळी खुलत व्हतीभांडण विसरून गाडीभलतीकडेच वळत व्हतीनंतर रात्र झालीविजा चमकल्याढगांनी ढगाला कवेत घेतलेबेधुंद धारा बरसल्यातहानलेली जमीन तृप्त...
चिंब पावसानं रान झालं आबादानी या गीताच्या मुळ गीतकारांची माफी मागून…🙏 विडंबन चिंब घामात नहालो, आज चालतानीकाढू कशी बनियन माझी, सांगना गं राणी टाकू नको फाटंल बाई, मोहरीच्या कोनीआपटूनी धुतल्यावरती, करते तू मच्छरदाणी पाया पडते मी राजा, घे तुझी तू धुवूनीध्यानात मनात वासं, येतं उमचाळूनी तुझ्या हातानीच टाक, आज खरंच पिळूनीपाण्यामंदी निरमा, रिन साबण लाऊनी अंगावरी तरतर फाटली, लाह्या उडल्यावाणीप्रश्न सुटे अवघड हा ही, दोघं...
भाग ५५मिडिया कम्युनिकेशन संवाद मिडिया कम्युनिकेशन संवाद म्हणजे काय?मिडिया-प्रसार माध्यम :Media प्रसार-माध्यम हि संकल्पना किंवा हे शब्दसुधा गेल्या १०-१५ वर्षातच अधिक प्रमाणात कानावर पडताहेत. १९८०-८५ पर्यंत मिडिया असा शब्द खूप वेळा कानावर पडत नव्हता, परंतु गेल्या १०-१५ वर्षात आणि खास करून गेल्या ७-८ वर्षात तर मिडिया-प्रसार-माध्यम हे शब्द रोजच्या व्यवहारातले, अगदी सर्रांस वापरातले असेच शब्द झालेले आहेत. पूर्वी कथा-कीर्तन, व्याख्यान-प्रवचन,...
भाग ५४- धर्मादाय संस्थांसाठी नियमांत अर्थसंकल्पात महत्वपूर्ण बदल भारतामध्ये सामाजिक जाणिवेन काम कार्यरत आहेत. या संस्था गरिबी निर्मुलन, शिक्षण, आरोग्य आदी उपयुक्त विषयांत देत आहेत. या कारणाने प्राप्तीकर कायद्यानुसार अशा धर्मादाय संस्थांचे उत्पन्न करमुक्त ठेवले आहे. परंतु करांची सवलत केवळ योग्य प्रकारच्या संस्थांनाच मिळावी यासाठी काही नियमांची पूर्तता करणे आवश्यक असते, २०१४-१५ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल...