ऐ प्रिय,लता आणि सचिनतुम्हाला मिळालाय भारतरत्न या देशातूनकृषिप्रधान या देशात बेजबाबदार वक्तव्यानेतुम्ही उतरलात भारतीयांच्या मनातून
क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणारा तूअन् मंजूळ आवाजानं रसिकांना वेड लावणारी लताजगाचा हा पोशिंदा शेतकरीजाणून घ्या रे याच्याही जगण्याच्या व्यथा
तुमच्यापेक्षा रिहाना आणि ग्रेटा बरेशेतकरी आंदोलनाची चर्चा होतेय परदेशातूनदेश महत्वाचा तर आहेच भारतरत्नांनोपण याच कृषिप्रधान देशात आंदोलन घडतयंजगाचा पोशिंदा शेतकऱ्याच्या हातून
आटवून रक्त काळ्या मातीतरत्न उगविणारा हा...
नामा लय प्रयन्त केले,तुझ्या सारखी,विद्रोही कविता लिहिण्याचीतुझ्या सारखी विद्रोही कवितामला लिहायला नाही जमलीशेवटी तुझ नाव लिहिलअन कविता विद्रोही झाली…….
नामा तुझी समाजव्यवस्थेची चीड पाहूनमी ही हातात लेखनी घेतलीगांडू,लवडा,शब्द लिहिण्याचीखरच नामा मला भीती वाटू लागली
काय निडर तुझी लेखनी होतीकाय तुझ्यातला तो निर्भीडपणा होतामाझ्यात आजून तेवढी,ताकद नाही आलीतुला वाचल्यावर नामामाझी लेखनीच बेडर झाली
कच्च्या कच्च्या तू वार केलेसधर्माचा अन जातींच्या गांडीवरहंटरचे फटके मारलेसकसा...
चांगल राहून उपयोग नाही,तू वाईट वागलेला बरानात जोडण्यात अर्थ नाही,तू एकटा जगलेला बरा
कुणी नाही कुणासाठी,जो तो स्वार्थी कसा आहेमन मोकळ्या स्वभावात आता बदल केलेला बरा
मलाच का भेटतात अशी माणसे,मला माहीत नाहीमित्राला जवळ करण्यापेक्षा,मी शत्रू पोसलेला बरा
खूप दुःख होत जेव्हा,आपलीच….इग्नोर करतातअसल्या खोट्या नात्याचा मणका मोडलेला बरा
साध राहून काही साध्य होत नाही…या कलयुगातकुठेतरी जाऊन कविराज तू वनवास घेतलेला बरा
नको राहू या...
केली पाण्यासाठी धावपळंत्याच्या शोधात गेलंय बळंआली घशामधी जळजळं न्कशी भरू मी सांगा चूळं
पाणी नासून आलीया वेळ न्पाणी थेंब थेंब मिळं….
चल गं राणी, आणूया पाणीखेळूया घागरी संगं…उन्हाच्या पाऱ्यात,नसलेल्या वाऱ्यातभिजू दे घामानं अंग…माझ्या पोटात होते कळ….पाणी थेंब थेंब मिळ….
बायकोची कटकट,नुसतीच वटवटरोज रोज करतीय दंगातिला चूप म्हणतो,पाण्यास जातोकरू नको तू शिमगारागा रागानं आणतोय गाळंपाणी थेंब थेंब मिळं
पाणी नाय तळ्यात,ते हाय डोळ्यातपरिस्थिती दुष्काळी…निघून...
मरणाच्या दारातून जगण्याचीनिघालेली वरात!दुःख, दैन्य, दर्दभऱ्याकहाणीचे फिटतीलहे पांग कधीतरी…म्हणूनच पायातल्याबेड्या रोखू शकणारचनाहीत चालण्याची मनसुबे….राखेच्या ढिगार्यावरउभे असताना पेटूनउठण्याचे स्वप्न आहेचउराशी बाळगलेलं…कैक उन्हाळे-पावसाळेझीजवलेत, कोण म्हणतंनुसतं वय वाढलत्याबरोबर अनुभवाचाखजिना आहेच मोठ्याखस्ता खाऊन मिळवलेला..परिस्थितीच्या जोखडामुळं मार्गस्थ व्हायलाथोडा झाला ही असेलउशीर पण पायालापडलेली कुरुपे, घट्टे,खपल्या धरलेल्या जखमाचालताना वेदनाजाणवूच देणार नाहीत…कारण रस्ता कितीही खडतरअसला तरीही वेदनाआता जगण्याचा भागझाल्यात..आता फक्त स्वतःलाघुसळून लोण्या सारखामऊदारपणा आणी जिवनाचसारं आत्मसात...
अकोला (प्रतिनिधी ) - गेल्या काही दिवसांत विदर्भातील कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं चिंता वाढल्या. मध्यरात्रीपासून अकोल्यात नवे कडक निर्बंध जारी करण्यात आलेयेत. विदर्भात अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण सापडतायेत. अकोला जिल्ह्यात यावर्षी जानेवारी महिन्यात 1212 नवे रुग्ण आढळले होतेय. तर फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात तब्बल 939 रुग्ण आढळलेयेत. जानेवारीच्या तुलनेत फेब्रूवारी महिन्यात जिल्ह्याचा...
पंढरपूर : (प्रतिनिधी ) - वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. आणि याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. या आगळ्या-वेगळ्या विवाहाची उद्या सकाळीपासून सुरु होणारी धामधूम पंढरपुरकर व लाखो भाविकांना घरीच बसून पाहावी लागणार आहे. यंदाचा विवाह सोहळा खास असून या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव...
सातारा (प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे(NCP Shashikant Shinde) आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(BJP Shivendrasingh Bhosale) यांच्यातील वाद जिल्ह्यात गाजत होता. माझ्या वाटेला जाईल त्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट शशिकांत शिंदे यांना धमकीवजा इशारा दिला होता, त्यामुळे साताऱ्यातील राजकारण पेटलं होतं.
अशातच राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद...
मुंबई - गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुण्यात केलेल्या आत्महत्येवरून शिवसेना (Shiv Sena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात आरोप झाल्यापासून संजय राठोड हे बेपत्ता असून, राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याने ते गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येची घटना समोर...
नावाचा रुपाचा गुणाचा महिमाधर्मग्रंथात तुझा खूपचं आहेकारण,तू फक्त स्त्री आहे
धर्मग्रंथ लिहिणाऱ्या पुरुषांनीचएकिकडे देवीचं रुपतर दुसरीकडे स्वतः च्या स्वार्थासाठीदुय्यम स्थान दिलेकारण,तू फक्त स्त्री आहे
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताही संस्कृती खरीपण पुरुष प्रधान संस्कृतीततुलाच पाहून म्हणतातपायातली वाण पायातचं बरीकारण,तू फक्त स्त्री आहे
पुरुषानं जशी जात निर्माण केलीतसा धर्महीअन् याच धर्मानं आधी पुरुषाचीम्हणजे ॲडमची निर्मिती केलीउपभोगण्यासाठी ॲडमच्या बरगडीतूनइव्ह म्हणजे तू आलीकारण,तू फक्त...









