आजरा ( प्रतिनिधी ) : आजरा येथील युवा सेना व शिवसेना वतीने आर्मी डे चे औचित्य साधून सेवानिवृत्त एसीपी नाईक सुभेदार संभाजी घाटगे यांचा दि. १७ रोजी सत्कार करण्यात आला. घाटगे १ जानेवारी रोजी. २४ वर्ष देश सेवा बजावत जम्मू काश्मीर येथील नवशेरा सेक्टर येथुन सुखरुप घरी पोहचले या आनंदाने महाराष्ट्रात प्रथमच सेवानिवृत्त सैनिकाची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती....
निवडणूक म्हटले कि राजकारण, झंझट, पैसा, घोडेबाजार, पोकळ आश्वासने या व अशा अनेक घृणास्पद गोष्टींनी निवडणुकांना ओळखल्या जाते. पण हीच राजकारणाची ओळख असेल तर गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टिंचे काय होईल? काय झाले आहे? हे आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. फक्त निष्पक्ष दृष्टिकोनातून बघावे. निवडणुकांच्या किंवा राजकारणाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करता येतो...
पावसाळा सुरु झाला की या हंगामात बाहेर पडतात ते किडे. यात सगळ्यात भयानक किडा म्हणजे गोम. याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. गोम चावल्यावर किंवा कानात घुसल्यावर काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय नक्कीच...
प्रतिनिधी : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
आजरा : (अमित गुरव ) - उत्तुर - कोल्हापूर रस्त्यावरील धोकादायक वळणावर हुंडाई क्रेटा गाडीच्या अपघात झाला. त्यात रोहित रमाकांत कुडाळकर (वय २२ ) रा कुंभारवाडी -कुडाळ हा युवक जागीक ठार झाला तर सिद्धेश सूर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे. ...
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. ...
संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून...
आजरा (अमित गुरव ) - दि आजरा अर्बन को- ऑप.बँक आजरा (मल्टी -स्टेट ) ची सुवर्णमहोत्सवी बँकेची सर्वसाधारण सभेचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश डांग होते. सभेत बिनविरोध सभेची माहिती सहाय्यक निबंधक अरुण काकडे यांनी दिली. ...
घडामोडी
बर्ड फ्ल्युने नुकसानग्रस्त कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत द्या… – आ. पाटील
अमित गुरव
डोंबिवली : बर्ड फ्ल्युने नुकसानग्रस्त कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत द्या.अशी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून याबाबतचे पत्र दिले आहे.
कोरोनाच्या महासंकटातून सावरत असताना पोल्ट्री व्यवसायिकांना बर्ड फ्ल्युने घेरले असून सोमवारी मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया, चंद्रपूर...
मुंबई: (प्रतिनिधी ) - कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. १८ वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ...








