घडामोडी
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र गडहिंग्लज तालुकाध्यक्ष ‘नितीन मोरे’ तर उपाध्यक्ष अभिजित मांगले यांची नियुक्ती
अमित गुरव
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या गडहिंग्लज तालुकाध्यक्षपदी नितीन मोरे तर उपाध्यक्ष अभिजीत मांगले,सचिव अमित कांबळे व खजिनदारपदी धनंजय शेटके यांची निवड करण्यात आली आहे.
सदरच्या निवडी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसाहेब फास्के व उपाध्यक्ष दीपक मांगले मार्गदर्शनात करण्यात आल्या. नितीन मोरे यांना निवडीचे पत्र उपाध्यक्ष दीपक मांगले व गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे...
सरकारने अलीकडच्या काळात मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे प्रिंट , डिजिटल , सोशल मीडिया वर राज्य सरकार त्यांच्या बातम्या वर नजर ठेवणार त्याच प्रमाणे त्यांचा अहवाल सादर केला जाईल. या माध्यमातून राज्य सरकारशी संबंधित नकारात्मक बातम्यांवर नजर ठेवेल आणि अहवालाचा आधार घेत सबंधित मिडिया वर कार्यवाही...
कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा श्री. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.
पण त्यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री केले गेले. यावर काही दिवसापासून खलबत्ते रंगली होती. अश्यातच मुश्रीफ यांनी वाशिम - कोल्हापूर -मुंबई हे साधारण 800 किमी प्रवास जमत नाही असे कारण देऊन पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे.
आजरा - (अमित गुरव ) -: आजरा शहर व उपनगराला नियमित व वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने 11 मार्च 2025 रोजी आजरा ग्रामस्थानी पुकारलेल्या महामोर्चा बाबत अन्याय निवारण समिती व सर्वपक्षीय वतीने निवेदन दिले आहे.
शहर वासियांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यासाठी अन्याय निवारण समितीने पाठपुरावा केला 1/1/2025 रोजी उपोषणाला बसले तेव्हा...
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन दिनांक ४ मार्च ते १० मार्च राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना येथे विविध कार्यक्रमानी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या सत्रात कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाषराव देसाई यांच्या शुभहस्ते सुरक्षितता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.
...
अमित गुरव -: सरपंच माधुरी गाडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावर १० सदस्यांनी सह्या केल्या . पण भादवण गावाने मात्र त्यानं त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.
अविश्वास ठराव विरुद्ध ९२६ आणि बाजूने ६७३ मते मिळाली . तर ३९...
घडामोडी
महाराष्ट्राचे माहिती महासंचालक डॉ. ब्रिजेशसिंह यांना प्रकट मुलाखतीसाठी निमंत्रण – डिजिटल मिडिया संघटना
अमित गुरव
६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनाची जोरदार तयारी
मुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या महा अधिवेशनाचे निमंत्रण महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ. ब्रिजेशसिंह यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच दिले.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी...
अमित गुरव - : भादवण या गावात अविश्वास ठराव आणला आणि हळूहळू वातावरण तापू लागले. २ मार्च रोजी संजय पाटील समर्थक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेत त्यांनी आम्ही ही निवडणूक खंड पडलेला विकास घडवून आणण्यासाठी लावली असल्याचे ग्रामस्थांना संबोधित केले. तसेच सरपंच माधुरी गाडे यांनी मनमानी कारभार सुरु केला असा आरोप करत आपली तोफ डागाळली. आपल्या...
भादवण ता- आजरा गावाच्या रहिवासी कृष्णाबाई कुंभार( वय ९५ ) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , नातवंडे असा परिवार आहे. त्या बाबुराव कुंभार ( व्यवसाय शेती ) , आणि जोतिबा कुंभार ( नोकरी निवृत्त मुंबई पोलिस ) यांच्या आई आहेत. कुंभार कुटुंबियांच्या दुःखात माणुसकी ची ओळख असलेल्या भादवण गावचे समस्त नागरिक सहभागी आहेत .
घडामोडी
दि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोशिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न……!!!!
अमित गुरव
कोल्हापुर :- दि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोशिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली , माजी अध्यक्ष अरविंद जैन उपाध्यक्ष श्री निळकंठ सांगवडेकर सेक्रेटरी श्री शिरीष साबणे खजानीस श्री चेतन जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूपुरी गवत मंडई येथील हॉटेल झोरबा मध्ये उत्साहात पार पडली.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सुरवातीस संस्थेचे सभासद , वारसदार व्यापारी, तसेच...










