Home Blog Page 47
अमित गुरव - भादवण ता . आजरा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव संपन्न झाला. किल्लेवलभ गड येथून शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तालुकास्तरीय लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये १५ स्पर्धक गटांनी आपली कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
PM Kisan Yojana
मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो. या प्रवेश प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरूवात करण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता यावा यासाठी कृषी महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गतवर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रवेश प्रक्रियेला...
वर्धा : सरकारी नौकरी मिळावी हीच कोणत्याही शिक्षित विद्यार्थी इच्छा बाळगून असतो. दहावी ते पदवी तसेच विविध तंत्र शाखेत अश्या नोकऱ्या केव्हा उपलब्ध होतात, याची चातकासारखी वाट इच्छुक बघत असतात. आता महापारेषण या विद्युत कंपनीने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनी सुपरिचित आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध पदांच्या शेकडो जागा रिक्त...
माद्रिद : पृथ्वीशिवाय आणखी कोणत्या ग्रहावर जीवन आहे का, या प्रश्नाने शास्त्रज्ञ-संशोधक नेहमीच पछाडलेले असतात. वर्षांनुवर्षे त्यावर सखोल संशोधनही सुरू आहे. अशाच एका संशोधनात असे आढळून आले आहे की, असाही एक ग्रह आहे, जिथे आपल्या पृथ्वीसारखे जीवन शक्य आहे. हा ग्रह फक्त 20 प्रकाशवर्षे दूर आहे आणि त्याला 'एचडी 20794 डी' असे नाव देण्यात आले आहे. तो सूर्यासारख्या तार्‍याभोवती...
कोकण म्हणजे निसर्गरम्य छायेमध्ये डोलणारे जणू एक स्वर्गच..कोकणची ख्याती वर्णवी तेवढी कमीच, विकत देखील घेता येणार नाही अशी किमया कोकणामध्ये आहे. स्वच्छ व सुंदर निसर्ग, रानमेवा, जागृत देवस्थान, दऱ्या, किनारे पर्यटकांच्या मनाला आणि डोळ्यांना भुरळ पडेल असे मोहक दृश्य हवेहवेसे वाटतात.पिढ्यानंपिढ्या चालत आलेल्या रूढी आणि परंपरांना, सणवार, दरवर्षी नित्यनेमाने जपून पुढे चालू ठेवण्याचे कार्य कोकणात उत्तम प्रकारे चालते.. कोकणी...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पत्रकारांचा यथोचित सन्मान : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उपक्रम कोल्हापूर/ प्रतिनिधी : स्त्री पुरुष समानता घरातूनच सुरु व्हायला हवी. प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करत कुटुंबाला प्राधान्य देणारी, प्रत्येकाची काळजी घेत कुटुंबाच्या हितासाठी सदैव राबणारी स्त्री ही सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. सौ. रुपाली पाटील यांनी केले. ...
कानोली ( वार्ताहर ) - ग्रुप ग्रामपंचायत कानोली /हारूर वतीने हारूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा पाटील होत्या, स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर यांनी केले, यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उत्पादन शुल्क अधिकारी अक्षता कुपटे होत्या. यावेळी बोलताना कुपटे यांनी महिलांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य या बाबत माहिती दिली, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी...
भादवण- आदर्श विद्या मंदिर भादवण या शाळेत आज महिला दिनानिमित धाडसाने पुढे कसे जावे , महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहराकडे जावे लागेल तेव्हा तिथे आपला व्यवहार कसा असावा . रॅगिंग आणि इतर प्रकार याबाबत थोडक्यात लोकनियुक्त सरपंच माधुरी गाडे व्यक्त झाल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कुराडे आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. https://linkmarathi.com/why-is-march-8th-celebrated-as-international-womens-day-lets-look-at-the-hidden-history-behind-this/
गडहिंग्लज : रोटरी क्लब गडहिंग्लज, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ आणि डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. पोलिस, होमगार्ड आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हे विशेष शिबिर झाले.गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष दीपक मांगले यांनी उपस्थितांचे स्वागत करत शिबिराचा हेतू स्पष्ट केला.दीपक...
आजरा .- प्रतिनिधी. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या आजरा तालुकाध्यपदी सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्रचे संपादक संभाजी जाधव तर उपाध्यक्षपदी अमित गुरव यांची निवड करण्यात आली.तसेच सचिव सुभाष पोवार, सुभाष पाटील सल्लागार, यांची निवड करण्यात आली आहे. सदरच्या निवडी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसाहेब फास्के व उपाध्यक्ष दीपक मांगले मार्गदर्शनात करण्यात आल्या. यांना निवडीचे...