लिंक मराठी ( विशेष प्रतिनिधी )
आर्थिक मार्गदर्शनआजच्या डिजिटल युगात बँक खाते प्रत्येकासाठी गरजेचे झाले आहे. पगार, पेन्शन, शिष्यवृत्ती, सरकारी योजना, मोबाईल पेमेंट, UPI व्यवहार — हे सगळं बँक खात्याशिवाय शक्य नाही. पण अनेकांना एक प्रश्न पडतो — आपल्यासाठी नेमकं कोणतं खाते योग्य आहे?👉 बँक खाते म्हणजे काय?बँक खाते म्हणजे बँकेत उघडलेले अधिकृत आर्थिक खाते. यात आपण...
घडामोडी
मोठा वाद : अपूर्ण सुविधांवर पूर्णत्व दाखला ; नगरपंचायत व विकासका विरोधात उपोषणाची ठिणगी ?
अमित गुरव
आजरा | लिंक मराठी न्यूजआजरा नगरपंचायत हद्दीतील आजरा–गारगोटी मार्गावरील कमलकुंज आवारातील वाढीव ‘ए’ व ‘बी’ विंग इमारतीस देण्यात आलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्यावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणाने आता चांगलाच ताप घेतला आहे. आवश्यक नागरी सुविधा पूर्ण नसतानाही इमारतीस पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) देण्यात आल्याचा आरोप करत आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती आणि कमलकुंजमधील सदनिकाधारकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
“पूर्ण...
कोल्हापूर ( लिंक मराठी न्यूज ) -: इराण आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी विमान सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. ...
घडामोडी
चंदगड पंचायत समिती सभापती निवड १० मार्चला ; विलास नाईक आघाडीवर, उपसभापती पदावर सस्पेन्स कायम
अमित गुरव
चंदगड -: ( लिंक मराठी न्यूज ) चंदगड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी १० मार्च २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून तालुक्याच्या राजकारणात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
विलास नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य...
घडामोडी
आजरा नगरपंचायतमध्ये निधी उधळपट्टीचा आरोप; लोकवस्ती वगळून निर्जन भागात रस्ते — नगरसेविका निशांत चांद
अमित गुरव
आजरा | लिंक मराठी न्यूज आजरा नगरपंचायतीच्या कारभारावर सत्ताधारी आघाडीतीलच नगरसेविका निशांत चांद यांनी कडक शब्दांत टीका करत निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकवस्ती नसलेल्या साबाज फार्म हाऊस परिसरात लाखो रुपयांचा रस्ता उभारण्यात आल्याचा आरोप करत, मदरसा कॉलनी व साई कॉलनीसारख्या प्रत्यक्षात नागरिक राहत असलेल्या वस्त्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.“नगरसेविका...
“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…”
दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी भाषिकांमध्ये अत्यंत अभिमानाने साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन.हा दिवस थोर कवी, साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, साहित्यिक वैभवाचा आणि सांस्कृतिक ओळखीचा गौरव करण्यासाठी...
आजरा (अमित गुरव ) – आजरा तालुक्यातील पोळगाव येथील श्री. पांडुरंग लक्ष्मण कोरेवाडकर यांनी रेशन दुकानातून धान्य वितरणात झालेल्या कथित कपातीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शासनाकडून मंजूर असलेले ठरावीक प्रमाणातील धान्य प्रत्यक्ष वितरणावेळी कमी दिले जात असल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित रेशन दुकानदाराकडून याबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले...
आजरा - ( अमित गुरव )भादवण (ता. आजरा) येथील विश्वजीत गणपतराव डोंगरे (वय ४२) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कमी वयातच त्यांचा लोकसंपर्क जास्त होता.त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
घडामोडी
कोल्हापूर येथे राज्य कार्यकारिणी बैठक : संघटनेचे नाव ‘ऑल इंडिया डिजिटल मीडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशन’ करण्याचा ठराव मंजूर
अमित गुरव
कोल्हापूर ( अमित गुरव )-: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक काल सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथे पार पडली. देशभर वाढलेल्या कार्यक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे नाव बदलून “ऑल इंडिया डिजिटल मीडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशन (AIDMEJ)” असे करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.बैठकीत राजा माने यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे घोषणा करण्यात...
घडामोडी
उत्तूर मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; प्रचार, मीडिया आणि आत्मविश्वास ठरतोय निर्णायक घटक
अमित गुरव
उत्तूर ( प्रतिनिधी ) -: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तूर मतदारसंघ यंदा केवळ मतदानापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण आजरा तालुक्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. पारंपरिकदृष्ट्या निर्णायक मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात यावेळी नेत्यांची प्रतिष्ठा, पक्षांची ताकद आणि कार्यकर्त्यांची निष्ठा पणाला लागल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.आजरा–भादवण परिसरात सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराची धार वाढवत थेट घराघरात...









