भादवण -: केदारनाथ मंदिराच्या भक्तीमय वातावरणात आज सेवाभावाचा एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. अजित भिवा पाटील, सुभाष तुकाराम गाडे आणि प्रशांत परबत पाटील या केदारनाथ भक्तांकडून मंदिरासाठी नवीन साउंड मशीन भक्तिभावाने अर्पण करण्यात आली. ही साउंड मशीन मंदिराचे पुजारी आणि सर्व केदारनाथ भक्तांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आली. या वेळी भक्तीचा नाद अधिक स्पष्ट आणि प्रभावी व्हावा, हा या सेवेमागील शुद्ध...
वाटंगी -: ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कॅन्सरचे लवकर निदान व्हावे तसेच तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला मिळावा या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबिरामध्ये एकूण ४१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
...
या धक्कादायक दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज सकाळी बारामती येथे विमानाचे लँडिंग करताना घडली. अपघातात त्यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुर्घटनेचा तपशीलआज सकाळी ही घटना बारामती विमानतळाजवळ घडली, जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन...
घडामोडी
आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्जांची छाननी पूर्ण ; माघारीनंतर निवडणूक चित्र होणार स्पष्ट
अमित गुरव
आजरा ( लिंक मराठी ) आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी तहसीलदार कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पार पडली. छाननीनंतर पात्र ठरलेल्या अर्जांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार (दि. 27) रोजी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.🔹 पंचायत समिती – उत्तूर...
घडामोडी
भादवण वर शोककळा : गुरव कुटुंबाच्या मातृछायेचा अंत — कै. रंगुबाई रामचंद्र गुरव यांचे निधन
अमित गुरव
भादवण (ता. आजरा) —कै. रंगुबाई रामचंद्र गुरव (वय 92) यांचे वार्धक्याने आज शुक्रवार , दि. 16 जानेवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गुरव कुटुंबावर शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या अशोक गुरव ( भादवण सोसायटी संचालक) तसेच तुकाराम गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य) यांच्या मातोश्री होत. शांत, कर्तव्यदक्ष आणि कुटुंबवत्सल स्वभावासाठी त्या ओळखल्या जात.त्यांच्या...
घडामोडी
लाडक्या बहिणींना पहिला दणका : योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थीकडून बुलढाणा येथे वसुली
अमित गुरव
बुलढाणा ( लिंक मराठी ) -: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी “लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यास सुरुवात झाल्याचे संकेत मिळाले आहेत. योजनेचा गैरफायदा घेतल्याचे निष्पन्न झालेल्या एका लाभार्थीकडून बुलढाणा जिल्ह्यात वसुली करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे.प्राथमिक तपासात संबंधित लाभार्थीने पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतानाही चुकीची माहिती सादर करून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही...
श्रीमती सखुबाई मारुती गुरव (वय 70), रा. मोजे हेब्बाळ जलद्याल, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या शिवकृपा पतपेठीचे प्रतिनिधी जिवबा गुरव आणि संतोष गुरव यांच्या मातोश्री होत.त्यांचे रक्षाविसर्जन बुधवार , दि. २४/१२/२०२५ रोजी होणार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संपादकीय
कोल्हापूर जिल्ह्यात 2025 स्थानिक स्वराज्य निवडणूक निकाल जाहीर ; अपक्षांचा उदय, काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धक्का
अमित गुरव
कोल्हापूर | प्रतिनिधीमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालांनी स्थानिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी धक्कादायक विजय मिळवला, तर काही भागांत पारंपरिक पक्षांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.पन्हाळा नगरपरिषदेत अपक्षाचा धक्कादायक विजयपन्हाळा नगरपरिषद निवडणूक जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची ठरली. माजी नगराध्यक्षांच्या पतीला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला....
आजरा(प्रतिनिधी ):-आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित आदर्श हायस्कूल शिरसंगी व पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बुधवार दि. 10 व गुरुवार दि.11 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन व पद्मश्री भोजे अणुशास्त्रज्ञ यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी , प्रमुख वक्ते व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते...
आजरा(हसन तकीलदार):- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवार दि.१० डिसेंबर २०२५ रोजी सरोळी ता.आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमासह संपन्न होत आहे.या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून दि. ९ डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत.स्वागत,पादुका पूजन व...









