आजरा(हसन तकीलदार):-तालुक्याचे नगदी पीक आणि पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाचे उत्पादन आपल्या तालुक्यात उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. त्याला पूरक काजू बी प्रक्रिया व्यवसायिकांचे प्रकल्प प्रत्येक गावात सुरु आहेत. या प्रकल्पातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परंतु या व्यवसायातसुद्धा अनियमितता आणि अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी आपल्या विविध मगण्यांचे निवेदन पालकमंत्री व तहसीलदार यांना काही काजू उद्योजकांनी दिले आहे.
काही काजू प्रक्रिया उद्योजक एकत्र येत आपल्या समस्येबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, काजू उद्योजकासाठी अन्यायकारक आवश्यक नसताना बाजार समिती परवाना काढणेसाठी बाजार समितीचा तगादा कायमस्वरूपी बंद व्हावा. ऑनलाईन पोर्टलवर बाजारसामितीचा परवाना नाही शिवाय समितीकडून भरून घेतलेली रक्कम पावती हाच परवाना असे सांगितले जाते. काजू असोसिएशनकडून वेगळी रक्कम रु 1000/-व त्यांचे मार्फत नाही गेले तर वेगळी रक्कम रु. 3000/-हा फरक कशासाठी? सर्वांना समान न्याय मिळावा. परवाना बंधनकारक नाही तर ही वसुली कशासाठी हा प्रश्न आहे. आयात काजूबीच्या गाड्या अडवणूक करून बाजार समिती पैसे वसूल करत आहे. यावर ठोस कार्यवाही नाही. महावितरण कंपनीकडून सोमवार ऐवजी शुक्रवारी वीज खंडित व्हावी. शुक्रवारी बाजारचा दिवस असलेने कामगार कामावर येत नाहीत त्यामुळे सोमवार व शुक्रवार दोन दिवस कारखाने बंद ठेवावे लागतात. परिणामी आर्थिक फटका बसत आहे. छोटे कारखानदार नोंदणीकृत नाहीत ते घरगुती विक्री समजून त्यांना अन्नपरवाना बाबत सूट द्यावी. बॉयलरचे साधे व आय.बी.आर. असे दोन प्रकार आहेत. साधे बॉयलर ऍक्टमधून वगळावे. अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर पांडुरंग जोशीलकर, दशरथ बोलके, महादेव पोवार, युवराज सावंत, इंद्रजित देसाई, युवराज पाटील, संजय माने, शिवाजी गोडसे, वसंत निर्मळे, संगीता कटाळे, शंकर कसलकर, शुभम आजगेकर, पंकज कवळेकर, शिवाजी गुडूळकर आदींच्या सह्या आहेत.
काही काजू व्यावसायिक उद्योजकांचे मागण्यासाठी निवेदन तर संघटनेला विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होते-अध्यक्ष प्रकाश कोंडूस्कर यांचे मत
तालुक्याचे नगदी पीक आणि पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाचे उत्पादन आपल्या तालुक्यात उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. त्याला पूरक काजू बी प्रक्रिया व्यवसायिकांचे प्रकल्प प्रत्येक गावात सुरु आहेत. या प्रकल्पातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परंतु या व्यवसायातसुद्धा अनियमितता आणि अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी आपल्या काही मगण्यांचे निवेदन पालकमंत्री व तहसीलदार यांना काही काजू उद्योजकांनी दिले आहे. परंतु उद्योजक असोसिएशनच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, असोसिएशनला विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे. गैरसमज पसरवल्यामुळे व्यवसायिकदृष्ट्या अपायकारक आहे.
काही काजू प्रक्रिया उद्योजक एकत्र येत आपल्या समस्येबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, काजू उद्योजकासाठी अन्यायकारक आवश्यक नसताना बाजार समिती परवाना काढणेसाठी बाजार समितीचा तगादा कायमस्वरूपी बंद व्हावा. ऑनलाईन पोर्टलवर बाजारसामितीचा परवाना नाही शिवाय समितीकडून भरून घेतलेली रक्कम पावती हाच परवाना असे सांगितले जाते. काजू असोसिएशनकडून वेगळी रक्कम रु 1000/-व त्यांचे मार्फत नाही गेले तर वेगळी रक्कम रु. 3000/-हा फरक कशासाठी? सर्वांना समान न्याय मिळावा. परवाना बंधनकारक नाही तर ही वसुली कशासाठी हा प्रश्न आहे. आयात काजूबीच्या गाड्या अडवणूक करून बाजार समिती पैसे वसूल करत आहे. यावर ठोस कार्यवाही नाही. महावितरण कंपनीकडून सोमवार ऐवजी शुक्रवारी वीज खंडित व्हावी. शुक्रवारी बाजारचा दिवस असलेने कामगार कामावर येत नाहीत त्यामुळे सोमवार व शुक्रवार दोन दिवस कारखाने बंद ठेवावे लागतात. परिणामी आर्थिक फटका बसत आहे. छोटे कारखानदार नोंदणीकृत नाहीत ते घरगुती विक्री समजून त्यांना अन्नपरवाना बाबत सूट द्यावी. बॉयलरचे साधे व आय.बी.आर. असे दोन प्रकार आहेत. साधे बॉयलर ऍक्टमधून वगळावे. अशा मागण्या असून याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडूस्कर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे की, काजू बियावरील सेस (कर )भरण्यास असोसिएशन विरोधात आहे परंतु परवाना फी प्रती युनिट वार्षिक 1000/-₹ प्रमाणे ठरवली आहे. कारण शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन प्रतिकिलो 10/-₹ प्रमाणे अनुदान देते त्यासाठी खरेदीदाराकडे बाजार समितीचे लायसन्स असणे बंधनकारक आहे. आयात कच्च्या काजू बी मालावर सेस घेणे अन्यायकारक आहे. आणि सक्तीने सेस कर वसूल केला जात असेल तर असोसिएशनला माहिती द्यावी. विद्युतमंडळाकडून सोमवारचा दिवस देखभाल दुरुस्तीसाठी राखीव दिवस आहे. त्याऐवजी शुक्रवार करणे म्हणजे तालुक्याचा आठवडी बाजार दिवस असलेने बाजारदिवशी लाईट बंद करण्यास व्यापारी असोसिएशन आणि नागरिकांचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ग्रामीण भागात उद्योग, व्यवसाय वाढावा, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी विविध कार्यालयाकडून होणारा त्रास कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळे काही काजू उद्योजक असोसिएशनच्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत. ते व्यवसायिक दृष्टीने अपायकारक आहे. संघटना मदत करीत नाही असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी समोर येऊन चर्चा करावी. अध्यक्ष या नात्याने मी सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडूस्कर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक


