मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा ( आजरा )-: आजरा शहरासहसह संपूर्ण तालुक्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक दिलासा देण्यात यावा मागणी होत आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सुगी वेळी पावसाच्या जोरदार हजेरीने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. उभी भाग पिके पाण्यामध्ये आडवी झाल्याने व पावसाने उघडीप न दिल्याने कापणीसह मळणी प्रक्रियेवर मर्यादा आल्या आहेत.
यंदा तालुक्यात भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण होते. भात पिक उत्तम आलेही होते. बहुतेक ठिकाणी भात पिके कापणीच्या अवस्थेत पोहोचली होती. अवकाळी आणि परतीच्या पावसाने या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले भात पिक पूर्णपणे भिजून गेले, तर काही ठिकाणी पाण्याखाली गेले. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी हालचाली होण्याची गरज आहे.
ऊस करीत हंगाम कालावधी कमी होणार…
पावसामुळे अनेक कारखान्यांची पेटलेली धुरांडी शांत झाली आहेत. आणखी आठ दिवस परिस्थिती अशीच राहिल्यास कारखाना गणित हंगामाचा कालावधी कमी होऊन त्याचा परिणाम गाळपावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुर्दैवी…
दोन छकुल्यांना सोडून तिने घेतला जगाचा निरोप
आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दीड महिन्याच्या छोट्या बालकासह दोन छकुल्याला पतीच्या ताब्यात देऊन पेद्रेवाडी ता. आजरा येथील सौ. संचिता नितीन चव्हाण या पंचवीस वर्षीय विवाहितेने अखेर जगाचा निरोप घेतला. काल बुधवारी तिचे हृदयविकाराच्या आजाराने अखेर निधन झाले.
गेले काही महिने संचिता या हृदयविकाराच्या रोगाशी सामना करत होत्या. महिनाभरापूर्वी त्यांनी एका अपत्यासही जन्म दिला. दीड पावणे दोन वर्षाचे एक व महिनाभरापूर्वी जन्मलेले एक अपत्य अशी दोन अपत्ये झाल्याने सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबतची नोंद आजरा पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी झाली आहे. या घटनेमुळे पेद्रेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक


