Homeघडामोडीआजरा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पद आरक्षण सोडतीसाठी तारीख जाहीर

आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पद आरक्षण सोडतीसाठी तारीख जाहीर

आजरा (हसन तकीलदार) -: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दि. १ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. तहसील कार्यालय, आजरा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत ही सोडत पार पडणार असल्याचे परिपत्रकाद्वारे प्रशासनाने कळवले आहे.

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. १३/०६/२०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. ०६/०५/२०२५ रोजीच्या आदेशाचे पालन करत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार ही आरक्षण सोडत होणार आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार, आजरा यांनी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांना सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ही सोडत पारदर्शकपणे पार पाडली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून, पुढील पंचवार्षिक कार्यकाळासाठी गावातील नेतृत्व निश्चित करणारी ही महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे कळवण्यात आले आहे.

🟢 स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी एक नवी संकल्पना…

📢 “माहितीचा खजिना” आता तुमच्या खिशात!स्पर्धा परीक्षा म्हणजे तयारी, सातत्य आणि अपडेट राहणे…पण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या ठिकाणी माहिती शोधायची वेळ, खर्च आणि श्रम हे आव्हानच असतं.

🟡 म्हणूनच… आम्ही घेऊन आलो आहोत एक नविन, उपयुक्त व विद्यार्थीप्रिय संकल्पना – ‘चालू घडामोडी’ही संकल्पना:

📌 तुमचा वेळ वाचवेल

📌 तुमचे पैसे वाचवेल

📌 दररोज नविन चालू घडामोडी तुमच्या मोबाईलवर मोफत पोहोचवेल

📌 स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे संक्षिप्त व मराठीत

✅ जर ही संकल्पना तुम्हाला आवडली तर आजच फॉलो करा

✅ तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा

🎯 यशाच्या मार्गावर हा तुमचा विश्वासू सोबती ठरेल!

✍️ Link Marathi तर्फे — चालू घडामोडींची खात्रीशीर व सुलभ माहिती

अधिक अपडेट साठी follow करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular