Homeघडामोडीचंदगड विधानसभा मतदारसंघात उद्योजक मानसिंग खोराटे यांचे प्रचंड शक्ती प्रदर्शन: उमेदवारी अर्ज...

चंदगड विधानसभा मतदारसंघात उद्योजक मानसिंग खोराटे यांचे प्रचंड शक्ती प्रदर्शन: उमेदवारी अर्ज भरला

चंदगड: चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि अथर्व दौलतचे चेअरमन श्री. मानसिंग खोराटे यांनी दि. २८ रोजी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. मतदारसंघातील विविध गावे, वाड्या-वस्त्यांवरून मोठ्या संख्येने आलेल्या मतदारांनी खोराटे यांच्या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शक्तिप्रदर्शनात खोराटे यांचे नेतृत्व आणि जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अधोरेखित झाला.

श्री. खोराटे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ५ ऑक्टोबर रोजी चंदगड विधानसभेतून प्रारंभ झाला होता. या यात्रेमध्ये ३१० गावे आणि वाड्यांचा समावेश होता, ज्यामुळे हा ४५०० किलोमीटरचा प्रवास शाश्वत विकासासाठी जनतेचा आशीर्वाद मिळवण्याचा ध्यास घेऊन पार पडला. चंदगडच्या जनतेने या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे चंदगडच्या राजकारणात एक नवा अध्याय उघडला गेला आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेत श्री. खोराटे यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे नमूद केले की, “कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही.” त्यांनी जनतेसमोर ठाम भूमिका मांडली की, चंदगडच्या विकासासाठी त्यांचे कार्य अखंड सुरू राहील आणि आपला निर्णय कायमस्वरूपी असेल. यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दलची जनतेतील आस्था अधिकच वृद्धिंगत झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी झालेली अलोट गर्दी पाहता श्री. खोराटे यांच्या जनआशीर्वाद यात्रेने खऱ्या अर्थाने जनतेत विश्वास निर्माण केला आहे. चंदगडच्या भविष्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढला असून विकासाला नवी गती मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. या यात्रेमुळे मतदारांची आस्था आणि विश्वास खोराटे यांच्याकडे अधिक वाढली असून, आगामी निवडणुकीत त्यांना मतदारांचा निश्चित आशीर्वाद मिळेल अशी चर्चा गावागावांत होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular