Homeआरोग्यFace looking tired, dark? चेहरा थकल्यासारखा, काळपट दिसतोय?

Face looking tired, dark? चेहरा थकल्यासारखा, काळपट दिसतोय?

Face looking tired, dark?

सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा सुंदर, ग्लोईंग दिसावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. दिवसभर मेकअप आणि रात्री मेकअप काढून झोपल्यानंतर चेहरा डल वाटतो. दूध हा पदार्थ सर्वांच्याच स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला पदार्थ आहे. त्वचेच्या समस्येच्या दूर करण्यासाठी दूधाचा वापर केला जातो.(How to clean face at home)

यात जीवनसत्त्वे, बायोटिन, पोटॅशियम कॅल्शियम आणि प्रथिने हे सर्व चांगल्या प्रमाणात आढळतात. हे गुणधर्म केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर डाग, डाग, मुरुम यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात.

Face looking tired, dark?
Face looking tired, dark?

क्लिंजर

त्वचा क्लिन करण्यासाठी लोक क्लिंजर विकत घेतात पण याऐवजी तुम्ही दुधाचा वापर करू शकता. हे एक बेस्ट क्लिंजर आहे. या क्लिंजरमुळे तेल, धूळ, माती सहज निघून जाते.

मेकअप रिमुव्हर

मेकअप रिमूव्हर म्हणूनही तुम्ही दूध वापरू शकता. तुम्ही दोन चमचे कच्चे दूध फ्रीजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ होईल आणि कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत.

मॉईश्चरायजर

दूधात नैसर्गिक मॉईश्चरायजिंग गुण असतात. व्हिटामीन ए आणि बायोटीन, लॅक्टिक एसिड, प्रोटीन्स असतात. त्वचेला पोषण मिळते. चेहऱ्याला दूध किंवा मलई लावल्यानं त्वचा हायड्रेट राहते. रोज रात्री दूध किंवा मलाई लावल्यानं त्वचेच्या संबंधित समस्या दूर होतात.

टोनर

स्किन ग्लो करण्यासाटी टोनरची गरज नसते. मिल्क टोनरचा वापर करू शकता. एका स्प्रे बॉटलमध्ये कच्च दूध घेऊन ते चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे चेहऱ्याला योग्य पोषण मिळेल आणि त्वचा चांगली राहील.

फेस मास्क

रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला फेस मास्क लावा आणि मुलतानी मातीमध्ये कच्च दूध मिसळा. नंतर चेहरा १५ ते २० मिनिटांसाठी सुकू द्या. नंतर पाण्यानं चेहरा स्वच्छ करा. यामुळे सुरकुत्या, एजिंगच्या समस्येपासून सुटका मिळते. त्वचेवर ग्लो येतो.

नाईट क्रीम बनवण्यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा. यानंतर त्याची पेस्ट बनवा आणि त्यात हळद आणि दूध मिसळा. ही पेस्ट एका भांड्यात ठेवा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. ही नाईट क्रीम काही तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही वापरू शकता. आठवड्यातून दोनदा ते लावणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

संदर्भ

अधिक माहिती

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular