हॅपी बर्थडे बापू
बापू जग तुम्हाला विसरले
तुमचे विचार झेपले नाहीत
आता तर तुमचे विचार नकोत
तुमचा साधा उल्लेखही नकोच
तुम्हाला अनुल्लेखाने मारणे
तुमच्या कार्याची खिल्ली उडवणे
ही लेटेस्ट फॅशन आहे बापू
तुमची तत्त्व तशीही
आता आउटडेटेड झालीत बापू
सत्य, अहिंसा, अपरिग्रह
स्वयंशिस्त, अनुकंपा, स्वदेशी
ही तत्त्व आता कोण पाळतो बापू?
तुमचा देश आता तुम्हाला
विसरायचे म्हणतोय बापू..
काही वर्षांनी बघा बापू
आमची नातवंड नक्कीच
नवा इतिहास शिकतील
त्यात तुम्हाला स्वातंत्र्यसैनिक नाही
तर देश बुडवणारा देशद्रोही
म्हटलेले असेल बापू…
तोपर्यंत सरकारी कार्यालयातल्या
फोटोत गपगुमान राहायचं बघा बापू
- डॉ. समिधा गांधी
- https://youtu.be/yB9ua3il8vs

मुख्यसंपादक
khar aahe madam