उत्तूरमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ – 50 मुलींना लस
अमित गुरव ( उत्तूर ) -: आज, रविवार 20 जुलै 2025 रोजी, उत्तूर येथे नामदार हसनसो मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा. वसंतराव धुरे, पंचायत समिती आजरा माजी उपसभापती मा. शिरीष देसाई, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र गुरव यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. गुरव यांनी HPV लसीकरणाचे महत्त्व सांगताना सांगितले की, “9 ते 26 वयोगटातील सर्व मुलींनी ही लस अवश्य घ्यावी, कारण ती भविष्यातील गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करते.”
उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून एकूण 50 मुलींना लसीकरण करण्यात आले असून, यामध्ये शाळेतील 48 आणि 2 शाळाबाह्य मुलींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन BNO श्रीमती भांडकोळी यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, गटप्रवर्तक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HPV लसीकरण म्हणजेच एक सुरक्षित पाऊल – आरोग्यदायी भविष्याच्या दिशेने!
👉 अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी फॉलो करा: www.linkmarathi.com
📲 फेसबुक:
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
📺 YouTube:
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📱 WhatsApp चॅनेल: Join Now
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



