आजऱ्यात भाजपला लागलेली गळती ही सुरुवात आहे का…
आजरा ( अमित गुरव ) – भाजप पक्षामध्ये निष्ठावंतांना स्थान नाही , त्यांची टेहाळणी केली जाते , अपमानास्पद वागणूक मिळते , या सर्वांना कंटाळून आजर्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपला शेवटचा रामराम ठोकला आणि यापुढे सोयीचे राजकारण करणार असे जाहीर केले.
ज्यांनी पक्ष वाढवला त्यांचा अपमान आणि आयत्या बिळावर नागोबा झालेल्यांना मान त्यामुळे जिथे इज्जत नाही तिथे राहायचे नाही असे ठाम मत व्यक्त केले आहे . चंद्रकांत दादा पाटील हे नेहमी आमची भेट नाकात होते , पक्ष वाढीसाठी प्रोत्साहन देत नव्हते आता आमचा त्यांच्यावर ही विश्वास नाही .
याप्रसंगी सुधीर मुंज , सुधीर कुंभार , बापू टोपले , अरुण देसाई , इंदुरकर सचिन , धनाजी पारपोरकर , रमेश कालेकर , दयानंद भुसारी तसेच बहुसंख्य कार्यकर्ते यांनी पक्षाला अखेरचा निरोप देत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
इतके दिवस दुसऱ्या पक्षांचे नेते फोडताना जनतेने पाहिले आहे आज त्यांच्याच पक्षातील धुसफूस त्यांचा पक्ष फुटण्यासाठी कारणीभूत ठरत आहे ; त्यामुळे जशी करनी तशी भरणी हा नियम लागू झाला असे जनतेतून बोलले जात आहे. याचप्रमाणे पक्ष जिल्हात फुटत राहिला तर कोल्हापुरात भाजपची अवस्था तावडे हॉटेल प्रमाणे होण्यासाठी वेळ लागणार नाही.

मुख्यसंपादक