Homeघडामोडीराज स्पोर्ट्स कडून लोकांच्या अपेक्षेत वाढ

राज स्पोर्ट्स कडून लोकांच्या अपेक्षेत वाढ

अमित गुरव ( भादवण) -: यल्लामा देवी च्या यात्रेतून माघारी आलेल्या भक्ताचे स्वागत करण्यासाठी राज स्पोर्ट्स भादवण चे सदस्य कार्यरत होते. भक्तांसाठी मंडप ची तयारी तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा केला . तसेच त्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणी साठी दिलेल्या निवेदनाला यश आले. भक्ताची आरोग्य तपासणी करण्यासाठी केलेला पाठपुरावा म्हणून भादवण आरोग्य केंद्र यांनी तपासणी केली. यावेळी भादवण केंद्रातील एस. एस. दळवी ( सिस्टर ), संजीवनी गोईलकर (आशा ,) आशा सुतार (आशा ) हे कर्मचारी उपलब्ध होते.या मागणीची दखल लिंक मराठी ने घेतल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र गाडे यांनी पत्रकार अमित गुरव यांचे आभार मानले.

या नियोजनबध्द कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थ संतुष्ट असून त्यांच्या कडून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत असे ग्रामस्थ बोलत होते. या नियोजनबध्द प्रयत्नाला प्रशासनाकडून पुढील काळात साथ मिळाली तर ही तरुण पिढी असेच वेगवेगळी सामाजिक कामे जोमाने करतील अशी चर्चा होती.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular