Homeघडामोडी"सामाजिक बांधिलकीचा संदेश – आजरा तालुक्यात रक्तदान शिबिर उत्साहात पार"

“सामाजिक बांधिलकीचा संदेश – आजरा तालुक्यात रक्तदान शिबिर उत्साहात पार”

आजरा ( अमित गुरव ) –
कोल्हापुरच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ९ जुलै २०२५ रोजी आजरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून ते २० जुलै २०२५ या कालावधीत राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . त्याचाच एक भाग म्हणून आजरा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आजरा, येथे हे रक्तदान शिबिर झाले.त्यांचे उद्घाटन तहसीलदार श्री. समीर माने यांच्या हस्ते सम्पन्न झाले.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:

तालुक्यातील सर्व विभागीय अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, विविध समित्यांचे सदस्य तसेच नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते .

आरोग्य विभागाचे 27 कर्मचारी, शिक्षक – ३, ग्रामपंचायत सदस्य – 2, आजरा अर्बन बँक – 5 , तहसील कार्यालय – 1 , पंचायत समिती – ३, ग्रामसेवक – 1 आणि इतर – 2 अशा प्रतिनिधींनी चे रक्तदान झाले.

हा उपक्रम राजर्षी शाहू महाराज यांच्या २०२५ मधील स्मृती महोत्सवात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे समन्वयन व यशस्वी नियोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आजरा यांच्याकडून करण्यात आले .

सदर उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत होणार असून, ग्रामविकास व आरोग्य संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी डॉ. अमोल पाटील ( वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आजरा ) , डॉ. आर. जी. गुरव ( तालुका आरोग्य अधिकारी ), विजय थोरवत तसेच आजरा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान – आपल्या थेंबातून एखाद्याचे आयुष्य वाचू शकते!

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular