आजरा (हसन तकीलदार):-महाराष्ट्र मेडिकल कौन्सील (एम.एम.सी.) ही ऍलोपॅथी पदवी प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी व नियंत्रण करणारी संस्था आहे. तरीसुद्धा होमिओपॅथी करणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मेकोलॉजि हा कोर्स सुरु करून त्यांना एम. एम. सी. ची नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय साडेपाच वर्षे व त्या पुढील शिक्षण घेतलेल्या ऍलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय शासनाने रद्द करावा असे निवेदन आजरा इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आजऱ्याचे नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या वेगळ्या रुग्णचिकित्सा पद्धती असून त्यांची औषध योजना व उपचार पद्धती ऍलोपॅथीपेक्षा वेगळ्या आहेत. या शाखामधील डॉक्टरांना त्यांच्या त्यांच्या पॅथी प्रमाणे नोंदणी करण्यासाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या वेगवेगळ्या संस्था आहेत. त्याप्रमाणे त्यांची नोंदणी होत असते. याचा विरोध इंडियन मेडिकल असोसिएशनने कधीही केलेला नाही. परंतु होमिओपॅथी शिकलेल्या डॉक्टरांना ऍलोपॅथी औषधे वापरता यावीत म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मेकॉलॉजी हा एक वर्षाचा कोर्स सुरु केला आहे. वास्तवीक ऍलोपॅथी मधील फार्मेकॉलॉजी हा विषय दीड वर्षे शिकवला जातो व संपूर्ण अभ्यासक्रमात त्याचा मेडिसिन सर्जरी गायनॅकॉलोजी या विषयांबरोबर कायम संदर्भ येत रहातो. असे असताना आठवड्यातून दोन-तीन दिवस फार्मेकॉलोजी शिकवून होमिओपॅथी डॉक्टरांना एम. एम. सी. ने दि. 30/06/2025च्या परिपत्रकाद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट साडेपाच वर्षे व त्या पुढील उच्चं शिक्षण घेतलेल्या ऍलिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे एम. एम.सी. ने घेतलेला निर्णय शासनाने रद्द करावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन आजरा आय.एम. ए. ने तहसीलदार यांना दिले आहे.
यावेळी डॉ. दीपक सातोसकर (प्रेसिडेंट आय. एम. ए.), डॉ. रविंद्र गुरव (व्हा. प्रेसिडेंट ), डॉ. अनिल देशपांडे (सेक्रेटरी ), डॉ. कुलदीप देसाई (ट्रेझरर), डॉ. अनिकेत मगदूम आदिजण उपस्थित होते.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक



