Homeघडामोडीप्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी च्या वाहतूक नियंत्रकाणे प्रवाशांना दिलेल्या सल्याने प्रवासी आक्रमक

प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी च्या वाहतूक नियंत्रकाणे प्रवाशांना दिलेल्या सल्याने प्रवासी आक्रमक

आजरा (अमित गुरव) -: आजरा बाजार असल्याने आज लोकांची वर्दळ होती. पण दुपारी तीन वाजल्यापासून बस न्हवती. संध्याकाळची नियमित असणारी गाडी ही न सोडल्याने चाफवडे येथील प्रवासी संतप्त झाले. यावेळी प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक राम मुंडे यांच्या कडे विचारणा केली असता चालत गावी जा असा अजब सल्ला दिला त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. प्रवासी स्त्री – पुरुषांनी बाजाराच्या पिशव्या घेऊनच दोन्ही गेट वर ठिय्या मांडला. यामुळे सुमारे तासभर तणाव निर्माण झाला होता.

  आजरा तालुका ग्राहक पंचायत आणि आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी प्रशासनाला जाब विचारला. अखेर पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी समजूत काढून त्यांना बस ची  व्यवस्था करून दिली. 

         यावेळी प्रवाशांच्या सेवेसाठी ह्या टॅग लाइन ची परिसरात खिल्ली उडवली जात होती.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular