पितृपक्षाचा पंधरवडा ,
पूर्वजांशी पुजण्याचा.
त्यांच्या पवीत्र स्मृतीला,
अभिवादन करण्याचा .१
मानव जीवनाचे तीन ऋण,
देवऋण ,पितृऋण ,गुरूऋण.
पितृपक्षाशी पूर्वजांशी नमन,
मुक्त होण्याशी पितृऋणातून.२
परंपरेचा आदर करण्याचा ,
विचार अगदी योग्यच आहे.
वृद्ध्वत्वात सुखी जीवनाचा,
विचार होणे क्रमप्राप्त आहे .३
ज्यांच्यामुळे आपण जंन्मलो,
विश्व सारे आपण पाहू शकलो.
अर्थ जगण्याला देऊ शकलो ,
नतमस्तक आपण होऊ शकलो.४
उदात्त विचार संस्कृती संवर्धनाचे,
मानू नका खुळचट अंधश्रद्धेचे.
अपुल्या पूर्वजांसाठी कृतज्ञतेचे,
विनम्रभावे नतमस्तक होण्याचे.५
पितृपक्षाच्या पंधरवड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांच्या चरणी माझे काव्यपुष्प सादर समर्पित करीत आहे .
श्री रेवाशंकर वाघ ठाणे
मुख्यसंपादक