आजरा ( प्रतिनिधी : )
आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अनुषंगाने मडिलगे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सोमवारी नियोजन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते.
बैठकीत महिलांसाठी आरोग्य शिबिर, लिंग आधारित हिंसाचार प्रतिबंध, कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबत जनजागृती, घरगुती कचरा वर्गीकरण तसेच जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समुपदेशन शिबिर आदी उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागातून अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गोविलकर सिस्टर, श्रीमती संगीता पाटील, सौ. वैशाली येसणे आशा स्वयंसेविका, शिक्षक प्रतिनिधी डॉ सामंत सर, स्थानिक पत्रकार संभाजी जाधव, महिला प्रतिनिधी सुप्रिया कातकर, मीनाक्षी कांबळे, सह सर्व समिती सदस्य उपस्थित होते. आभार सौ गोविलकर सिस्टर यांनी मानले.
बातमी मिळवण्यासाठी 7218434547 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करावा


मुख्यसंपादक



