भादवण ( अमित गुरव ) – भादवण मध्ये यात्रा संपली तोच राजकीय हालचालींना पुन्हा जोर असे चित्र दिसत आहे. पूर्वीचे राजकीय विरोधक समवेत संजय पाटील यांच्या वाढत्या गाठी भेटी अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.
भादवण मध्ये शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांची तातडीची बैठक पण नेमके कारण काय? लिंक मराठी मध्ये या हेडिंग ने आलेली बातमी ने तालुक्यात कुतूहल निर्माण केले होते . त्यावर त्याचे अनेकांनकडून पुढे काय झाले किंवा होणार अशी विचारणा झाली .
सरपंच माधुरी गाडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी त्यांचेच नेते संजय पाटील आघाडीवर असून त्यांनी त्यासाठी पूर्ण नियोजन केले आहे असेच वाटते. पण अविश्वास ठराव संमत झालाच तर पाटील हे श्री. हसन मुश्रीफ यांच्या संपर्कात असल्याने जर त्यांनी विनंती वजा अट टाकली तर त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना सरपंच पदाची धुरा सांभाळायला देतील का ? हा प्रश्न नक्कीच निर्माण होईल.
अविश्वास ठराव झाला तर कोणाला संधी मिळू शकेल?
जर भविष्यात सरपंच गाडे यांच्या वर अविश्वास ठराव संमत झालाच तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षामार्फत कडवट सामना करणाऱ्या जयश्री गाडे किंवा भादवण गावचे राष्ट्रवादी चे प्रमुख बी. टी. जाधव यांच्या सौभाग्यवती सविता जाधव यांच्या नावाची शिफारस श्री. मुश्रीफ करतील ?
चौकट -: विद्यमान सरपंच माधुरी गाडे यांनी केलेले काम ह्यामुळे ग्रामस्थ खुश आहेत. त्यांनी सत्तेच्या माध्यमातून अनेक मंडळे , आणि प्रतिष्ठित लोकांचे जाळे विणले असेल तरी पण त्यांच्या पती श्री. रणजित गाडे ह्यांनी श्री . समरजित घाटगे यांना दिलेली खंबीर साथ अनेकांना आवडली नाही असे दिसून येते. याबाबत त्यांच्या मदतीसाठी कोणती राजकीय – अराजकीय ताकत समोर येणार की ते स्वतः राजीनामा देणार ह्यावर राजकीय वातावरण किती तापणार हे ठरेल .


मुख्यसंपादक