आजरा (अमित गुरव ) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा तालुका आजरा येथील शुभारंभ विविध लोकप्रतिनिधींच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी, मलिग्रे, भादवण, उत्तूर तसेच ग्रामीण रुग्णालय आजरा यांच्या माध्यमातून एकूण १०८ पोलिओ बूथ कार्यान्वित करण्यात आले होते.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी २६५ कर्मचारी आणि २४ पर्यवेक्षक कार्यरत होते.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात ५,०३३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले असून ९१ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे.लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण पुढील चार दिवस घरभेटीद्वारे पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या मोहिमेस वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.”प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब – निरोगी बालक, पोलिओमुक्त भारत!”
बातमी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क अमित गुरव 8421666667


मुख्यसंपादक



