भादवण : ( अमित गुरव ) – प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र भादवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. मोहिमेचा शुभारंभ सरपंच सौ. माधुरी गाडे यांच्या हस्ते बालकाला लस पाजून करण्यात आला.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. रोहन पाटील, उपकेंद्राच्या सौ. शेवाळे सिस्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. बालकांना पोलिओमुक्त भवितव्य देण्यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
बातमी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा. अमित गुरव 8421666667


मुख्यसंपादक



