Homeघडामोडीघोटाळा घोटाळा आणि घोटाळा पोस्ट व्हायरल | Scam Scam and Scam Post...

घोटाळा घोटाळा आणि घोटाळा पोस्ट व्हायरल | Scam Scam and Scam Post Viral

सद्या एक images खूप प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा संक्षिप्त परिचय..

महापरीक्षा पोर्टल घोटाळा

परीक्षा देणाऱ्या प्रॉक्सी पासुन ते उमेदवारांनी सबमिट केलेल्या फोटो (छायाचित्रांमध्ये ) न जुळण्या च्या २०१९ मद्ये द वायरल तपासात वर्ग क आणि वर्ग ड पदासाठी च्या भरती प्रक्रिया मद्ये चांगलाच घोटाळा झाल्याचे उघड झाले होते.

TET घोटाळा

राज्य परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना ३ कोटी ५९ लाख ९९ हजार रुपयांच्या संपत्तीचा खुलासा करू शकले नाहीत. राज्यातील आठ मोठे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. सुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. त्यांच्यावर भाष्टरचाराचा आरोप आहे . त्यांनी ही संपत्ती १९८६ पासून २५ डिसेंबर २०२१ या कालखंडात कमावली आहे.
या प्रकरणी ७८०० विद्यार्थ्यांकडून प्रती विद्यार्थी दिड ते दोन लाख रुपये घेतल्याचा अंदाज आहे. या सर्वांना (विद्यार्थींना ) कायमची परीक्षा बंदी घातली आहे.

तलाठी पेपरफुटी

तलाठी पेपरफुटी म्हणजे देशद्रोहच आहे. ही परीक्षा ताबडतोब रद्द करा आणि MPSC मार्फत पुढील ४५ दिवसात परीक्षा घ्या अशी मागणी आप ने केली होती. डमी गणेश गुसुंगे तलाठी परीक्षेत उत्तीर्ण होणे म्हणजे शासनाचा कारभार कसा चालतो हे यातूनच समजते असे म्हणत आप ने या प्रकरणाला वाचा फोडली होती.

महानिर्मिती पेपरफुटी २०२३

महानिर्मिती मद्ये झालेल्या पदभरती परीक्षेचा पेपर फुटीचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती ने केला होता त्यावर महानिर्मिती ने त्यांना काही पुरावे असतील तर पोलीस किंवा महानिर्मिती कडे देण्याचे आवाहन केले होते.
पेपर सुरू असताना बटन कॅमेरा तून काढलेले फोटो समोर आले. त्यामुळे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती.

वनविभाग पेपरफुटी २०२३

छत्रपती संभाजीनगर येथे वनसंरक्षक भरती परीक्षेत विद्यार्ध्याना चिखलठाण्यातील शिवराना करियर अँकॅडमी येथून उत्तरे पुरवली जात असल्याचे उघडकीस आले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी परीक्षा संपण्याच्या आधी त्यावर छापा टाकला त्यामध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि पुस्तकांच्या माध्यमातून उत्तरे पुरवली जात होती. पोलिसांची भणक लागल्याने ४ पळाले पण एक ( विनोद डोभाल ) सापडला होता.

मृदा आणि जलसंधारण पेपरफुटी २०३३

महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण मार्फत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ९ फेब्रुवारी रोजी परीक्षा जाहीर झाली आणि २० व २१ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली . मात्र परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी पेपर फुटीचा प्रकार समोर आला . विशेष म्हणजे हा प्रकार मृदा व जल संवर्धन अधिकारी यांनी केल्याचे समजते.

या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून ही Image मात्र सद्या खूप व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फेसबुक पेज ची लिंक सोबत देत आहोत.

https://www.facebook.com/share/p/1iqqSjAh7uG7mitc/?mibextid=xfxF2i

यावर उत्तर म्हणून त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत भास्कर जाधव यांना असे उत्तर दिले होते की , कुठल्यातरी व्हॉट्सअँप msg च्या आधारावर असे गंभीर आरोप करत आहेत तर मी त्यांच्यावर गुन्हेच दाखल करतो .

https://www.facebook.com/share/p/1iqqSjAh7uG7mitc/?mibextid=xfxF2i
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular