आजरा ( हसन तकीलदार ):-शिवसेना उबाठा तर्फे आजरा तालुक्यातील शेतकरी वर्गाबरोबर दुग्धव्यावसायिकासाठी जे. पी. नाईक चैतन्य हॉल आजरा येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. थायलंडचे वाणिज्य सल्लागार, गोकुळचे तज्ञ संचालक, अनेक पारितोषिकांनी सन्मानित, 27 देशात जागतिक स्तरावर काम केलेले, दुग्धव्यवसायावर अभ्यास केलेले डॉ. चेतन नरके हे प्रमुख वक्ते म्हणूं लाभले , पशुसंवर्धन, दुधातील व्यवसायिकता, जनावरांचे जातीवंत वाण, दूधवाढीसाठीचे उपाय, जनावरांचे संगोपन आदिविषयी परिपूर्ण माहिती देत डॉ. नरके यांनी उपस्थितांची मने जिंकली.
सुरवातीला डॉ. नरके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद भोपळे यांनी केले. प्रा. सुनील शिंत्रे यांनी मेळाव्याचे उद्देश स्पष्ट करताना म्हणाले कि, शिवसेना ही 80%समाजकारण आणि 20%राजकारण करते आणि समाजकारणाच्या उदात्त हेतूने या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपला भाग डोंगराळ असल्याने शेतीबरोबर काजू प्रकल्प, पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसाय करणे गरजेचे आहे. आपला देश अर्थव्यवस्थेत 4थ्या क्रमांकावर असला तरी 80%लोकांना फुकट राशन द्यावे लागते, लाडकी बहीण सारखी योजना राबवावी लागते याचा अर्थ सर्वसामान्य माणूस आजही अर्थसंकल्पातुन वंचित आहे ठराविक भांडवलदारांच्या पथ्याला पडून त्यांचाच उद्धार झालेचा दिसून येत आहे. तळागाळातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर यासाठी दुग्धव्यावसाय सुधारून त्यात व्यवसायिकता आणणे गरजेचे आहे असे त्यांनी विषद केले. त्यानंतर गोकुळचे अधिकारी महेश कोले यांनी डॉ. चेतन नरके यांच्याविषयी माहिती देताना म्हणाले कि, जागतिक स्तरावर काम करीत 27देशात आपला ठसा उमटवलेला आहे. शैक्षणिक घराण्याचा वारसा लाभलेले डॉ. नरके यांनी हजारो युवकांना एक आदर्श देत मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. चेतन नरके यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, जनावरांचे आरोग्य, जनावरांचे खाद्य, जातीवंत जनावरे याबाबत माहिती देताना आदर्श गोठा कसा असावा, जनावरांचे संगोपन कसे करावे, 100%मादी जन्मास घालण्याच्या पद्धतीबाबत सांगताना जास्तीत जास्त गर्भधारणा करून जातीवंत जनावरे आपल्याच गोठ्यात कशा पद्धतीने तयार होतील याकडे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याने लक्ष दिले पाहिजे. यासाठी जनावरांच्या आरोग्याचे व त्यांच्या खाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या वाढत आहे दैनंदिन जीवनात दुधाचे महत्व वाढत चालले आहे. म्हशीच्या दुधाला दर आणि महत्व जास्त आहे. यासाठी दुधाचे उत्पन्न वाढवणे काळाची गरज आहे. आजरा तालुक्यातील दूध धंद्याला चांगला वाव आहे. भारताचा दूध उत्पादनात जगात पहिला क्रमांक आहे. देशात 238मिलीयन मे. टन. दुधाचे उत्पादन होते पुढच्या 20ते 30वर्षात आपल्या देशाने 658मिलीयन मे. टन.दूध उत्पादन करण्याचे मानस केलेले आहे. प्रति जनावरामागे जेवढे लिटर दूध वाढवता येईल तितका नफा अपेक्षित आहे यासाठी दूध वाढीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी विषद केले.

तर अंजनाताई रेडेकर यांनीही गोकुळ विषयी माहिती देताना म्हणाल्या कि, गोकुळचा भागात रूट सुरु करणार, गोकुळने 61वर्षे पूर्ण करीत 18लाख ते 19लाख लि. दूध संकलनाचा टप्पा पार पाडला आहे. गोकुळने लाभांश ही वाढविला आहे. त्याचप्रमाणे गोकुळच्या ज्या ज्या महत्वकांशी योजना आहेत त्यांचा पूर्णपणे लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राज्य पातळीवर शूटिंग स्पर्धेत यश मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या महमदजैद मकानदार व श्रेयन बिरजे या विद्यार्थ्यांचा डॉ. चेतन नरके यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, डॉ. धनाजी राणे, के. व्ही. येसणे, कॉ. संपत देसाई, इब्राहिम लाडजी, ओमकार माद्याळकर, चंद्रकांत व्हराकटे, दिनेश कांबळे, महादेव गुरव, संजय सावंत, विश्वास चव्हाण, विजय केसरकर, महेश पाटील, किशोर मटकर, हुसेन तकीलदार, आनंदा कुंभार, उपकृषिधिकारी, तसेच तालुक्यातील दुग्धव्यवसायिक शेतकरी व गोकुळचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी संजय येसादे यांनी आभार मानले.
डॉ. चेतन नरके यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन link marathi ह्या युट्युब चॅनेल वर लवकरच उपलब्ध होईल.
Subscribe करा.
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक