Homeमहिलाआत्मविश्वासाने हाय हिल्स घालून चालण्याचा सर्वोत्तम मार्ग | The Best Way To...

आत्मविश्वासाने हाय हिल्स घालून चालण्याचा सर्वोत्तम मार्ग | The Best Way To Confidently Walk In Heels |

हाय हिल्स घालून चालण्याचा सर्वोत्तम मार्ग |

हाय हिल्स घालणं फॅशनेबल वाटतं पण ते घालून चालवत नाही, पडायची भीती, पाय दुखतात? घ्या स्टायलिश सिक्रेट मंत्र
हाय हिल्स आणि मुलींचे नाते घट्ट असते. प्रत्येक स्त्री ला कधी ना कधी हाय हिल्स घालण्याचा मोह होतोच. विशेषत: साडी नेसली किंवा एखादा ट्रेडिशनल पायघोळ ड्रेस घातला तर लग्नकार्य किंवा पार्टी- समारंभ अशा प्रसंगी हमखास हाय हिल्स घालावी वाटते. हाय हिल्स खूप अधिक काळ कॅरी करणं खरोखरंच कठीण काम असत. कोणताही सण, समारंभ, फंक्शन म्हटलं की आपण हाय हिल्स घालण्याला प्राधान्य देतो. आपण जितके सुंदर कपडे घालतो तितकेच सुंदर आपण पायातील हिल्स घालतो. काहीवेळा तर आपण आपल्या कपड्यांना मॅचिंग असणारे हिल्स घालतो. काही महिलांना तर हाय हिल्स घालण्याची हौस तर इतकी असते की पाय आणि टाचा कितीही दुखल्या तरीही त्या हाय हिल्स घालणं काही सोडत नाही.

हाय हिल्स घालून चालण्याचा सर्वोत्तम मार्ग |
हाय हिल्स घालून चालण्याचा सर्वोत्तम मार्ग |

आपल्यापैकी काही जणींना रोज हाय हिल्स घालण्याची सवय असते तर काही जणींना प्रसंगानुसार कधीतरी हाय हिल्स घालाव्याशा वाटतात. शक्यतो आपल्याला हाय हिल्स घालण्याची सवय नसली की अचानक कधी हाय हिल्स घातल्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. टाचा दुखून येणे, पाय दुखणे, पायांना फोड येणे, पायांच्या त्वचेला इजा होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, हाय हिल्स घालणे म्हणजे डोकेदुखी होऊ शकते. अनेकवेळा अनेक मुलींना इच्छा असूनही हाय हिल्स घालता येत नाही. अशा परिस्थितीत काही टिप्स फॉलो करून आपण अगदी सहजरित्या हाय हिल्स घालू शकता

हाय हिल्स घालण्याची सवय करून घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :-

१. हाय हिल्स न घालण्याची कारणे समजून घ्यावीत :-

आपल्यापैकी बहुतेक मुलींना हाय हिल्स दररोज घालण्याची सवय नसते. असे असले तरीही आपण कोणत्या ना कोणत्या खास प्रसंगी हाय हिल्स घालण्याचा प्रयत्न करतोच. काही मुलींना हाय हिल्स घातल्यामुळे पायांना वेदना होतात. टाचांना इजा पोहोचते. काहीवेळा तर पायांवर अतिरिक्त ताण आल्याचे देखील जाणवते. त्यामुळे बऱ्याच मुलींना खूप अस्वस्थ वाटते आणि त्या हाय हिल्स घालणे टाळू लागतात. यासाठीच कोणत्याही खास प्रसंगी हिल्स घालण्यापूर्वी त्याची चांगली सवय करून घेणे आवश्यक आहे.


२. हाय हिल्सच्या टाचांच्या आकाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे :-

हाय हिल्सची खरेदी करत असताना कधीही घाई गडबडीत खरेदी करू नका. जर आपण घाई घाईत हाय हिल्सची खरेदी केली तर टाचांच्या आकाराची निवड करताना चुकू शकते. त्यामुळे जेव्हा आपण हाय हिल्सची खरेदी कराल तेव्हा घाई गडबड न करता टाचांच्या आकार योग्य आहे का ? तो आपल्या पायांना नीट योग्य पद्धतीने बसू शकतो का ? तसेच टाचांच्या आकाराची निवड करताना आपल्या पायांचे माप आणि आपण किती उंच टाचांची हिल्स घालू शकतो याचा व्यवस्थित विचार करून मगच हाय हिल्सची खरेदी करावी.


३. हळूहळू हाय हिल्सची सवय लावा :-

कोणत्याही खास प्रसंगी अचानक हाय हिल्स घालणे आपल्यासाठी कठीण होऊ शकते. यामुळे आपला आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू हाय हिल्स घालण्याची सवय लावावी. अगदी अचानकपणे हाय हिल्स घालण्याची सुरुवात करू नये, सर्वप्रथम हाय हिल्स घरी परिधान करून चांगला सराव करावा. यानंतरच हाय हिल्स घालून बाहेर जावे.


४. ब्लॉक हील्सपासून सुरुवात करा :-

थेट हाय हिल्स घालणे आपल्यासाठी खूप धोकादायक व हानिकारक असू शकते. यासाठीच आधी ब्लॉक हिल्स असलेली हिल्स घालण्याची सवय लावली पाहिजे. यानंतर, जेव्हा आपल्याला ते परिधान करण्यास आरामदायक वाटू लागते, तेव्हा हाय हिल्स घालण्याचा प्रयत्न करावा. हाय हिल्स घालताना, हे देखील लक्षात ठेवावे की आपल्या पायांचा जोर अंगठ्याऐवजी टाचांवर असायला हवा.


५. पम्प्स हिल्स घालून देखील सुरुवात करू शकता :-

सर्वप्रथम पम्प्स घालण्याची सुरुवात करावी त्यानंतर हळुहळु हाय हिल्स घालण्याला सुरुवात करावी. सर्वात आधी पम्प्स हिल्स घालून चालण्याचा सराव करावा. पम्प्स हिल्स घालून व्यवस्थित नीट चालता आले की मग हाय हिल्स घालण्याला सुरुवात करावी. पम्प्स हिल्स कॅरी करणे देखील खूप ट्रेंडी आहे आणि ते जवळजवळ सर्व कपड्यांना एक स्टाइलिश आणि ट्रेंडिंग लुक देतात. जेव्हा आपल्याला ते घालायची सवय होईल तेव्हाच हाय हिल्स घालण्याला सुरुवात करावी.

हाय हिल्स घालून चालण्याचा सर्वोत्तम मार्ग |
हाय हिल्स घालून चालण्याचा सर्वोत्तम मार्ग |

अधिक माहिती

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular