आजरा(हसन तकीलदार): येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुलात नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकासहित प्रशालेच्या प्रवेशद्वारावर वरूण राजांच्या साक्षीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले… प्रथम प्रशालेच्या प्रांगणातील विद्यादेवता माता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन संस्थेचे संचालक सचिन शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष एस पी कांबळे, सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील ,संचालक कृष्णा पटेकर, सुधाकर जाधव, विलास पाटील, प्राचार्य एम.एम. नागर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार उपस्थित होते.. व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन त्यांना वह्या, पुस्तक व ड्रेस (शालोपयोगी साहित्य )यांचे वाटप करण्यात आले. यावेळी काही पालकही उपस्थित होते त्यांचेही स्वागत करण्यात आले.

अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी शाळेत आलेल्या नवीन व जुन्या सर्व विद्यार्थ्यांना मन लावून शिकत आपले ध्येय साध्य करण्याबरोबरच आई-वडिलांचे स्वप्नही साकार करण्याबद्दल सांगितले. तुमचे यश हेच शाळेचे यश आहे या शाळेत आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारक्षम शिक्षण देण्याकडे आमच्या शिक्षकांचा विशेष कल असेल असे सांगून सर्वांना भरभरून आशीर्वादासह शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आर. पाटील यांनी केले तर पी.व्ही.पाटील यांनी आभार मानले.
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक