मुंबई :- प्रतिनिधी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या दबावासमोर एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर आलेल्या खासदारांची तिकीटं कापावे लागले तर काही ठिकाणी उमेदवार बदलावा लागला. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पहायला मिळत आहे.
यवतमाळ, नाशिक, हातकणंगले आणि हिंगोली येथील उमेदवार बदलण्याचा हट्ट सुरुवाती पासूनच भाजपने केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला या हट्टाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र अखेर भाजपच्या दबावापुढे शिंदेंना झुकावे लागल्याचे पाहायला मिळत आहे.एकीकडे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे तर दुसरीकडे शिवसेना नाशिक, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, कल्याण आणि ठाणे या जागांवर बॅकफूटवर जाते की काय? अशी चिंता शिवसैनिकांना वाटू लागली आहे. कारण या जागांवर देखील भारतीय जनता पक्षाने आपला दावा सांगितला आहे.
एकनाथ शिंदेंना असे का करावे लागले? भारतीय जनता पक्षाच्या सर्वेमध्ये नक्की काय होतं? भारतीय जनता पक्ष नक्की कशाच्या जोरावर शिंदेंच्या खासदारांवर किंबहुना शिंदेंवर दबाव टाकण्यासाठी यशस्वी ठरतोय. याविषयी राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर चर्चा केली असता त्यांनी काही मुद्दे सांगीतले.
शिंदेंसोबत आलेले खासदार हे लोकप्रिय नव्हते असे भाजपच्या सर्वे म्हटले गेले आहे. या काही खासदारांचा मतदारसंघात संपर्क नाही. व शिंदे सोबत आलेल्या सर्व आमदार, खासदार सर्वांच्यावर महाराष्ट्रात नाराजी आहे. याच बरोबर त्यांची तितकी कामही नाही. असेही त्या सर्वेत म्हटले आहे. असे जरी असले तरी, शिंदे त्यांच्या खासदारांना नाही म्हणू शकले नाहीत. अन् उमेदवारी देवून बसले. मात्र आता भाजपच्या सर्वेनुसार निवडणुक जिंकण्यासाठी शिंदेंना हे उमेदवार बदलावे लागला.
तर दुसरीकडे भाजपने शिंदेंना १४ जागा देवू केल्या.अश्यावेळी शिंदेंनी भाजपला विचारुन उमेदवार द्यायला हवे होते. याचे कारण म्हणजे शिंदे आज ज्या पदावर आहेत त्यात भाजपचा मोठाच वाटा आहे.परस्पर गरज होती.अशा वेळी हट्ट करायचा असला. तरी तो विचारपूर्वक करायचा असतो.तिथे शिंदे कमी पडले.मात्र एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची नस जाणतात. यामुळे एकनाथ शिंदे येत्या काळात कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष असल्याचे राजकीय जाणकार म्हणाले.
मुख्यसंपादक