अमित गुरव-: दिवाळी आली की उत्सुकता असते ती बोनसची . कारण आपल्याला जादा पगार किंवा पैसे मिळतात ही आशा. पण तो का मिळतो? कधी पासून ? हा बोनस मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केले व त्याची उत्तरे या लेखात पाहुयात..
फार वर्षापूर्वी आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती . पण इंग्रज भारतात आले आणि त्यांनी ही रीत बंद करून इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार द्यायची सुरवात केली. पूर्वी आठवड्याला एक म्हणजे वर्षाला ५२ आठवड्यांचा पगार मिळत असे. पण इंग्रजांनी लागू केलेल्या पद्धतीनुसार महिन्याला एक म्हणजे वर्षाला १२ पगार मिळतात. समजा महिन्यात ४ आठवडे ग्राह्य धरले तर वर्षाला १३ पगार होतात.
जेव्हा ही बाब डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी तत्कालीन सरकारला पत्राने कळवले. आणि कामगारांना हक्क न मिळाल्यास निदर्शने करण्याचा इशारा दिला.
ज्यावेळी सरकार १३ वा पगार देण्यासाठी तयार झाले मात्र तो कसा द्यायचा हा पेच निर्माण झाला तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संस्कृती नुसार वर्षात दिवाळी हा सर्वात मोठा सण त्याअगोदर एक पगार द्यावा असे सुचवले. त्याचाच परिणाम म्हणून ३० जून १९४० रोजी बोनस द्यायचा कायदा लागू करण्यात आला.


मुख्यसंपादक