Homeघडामोडीभादवणमध्ये भाजपला नवा चेहरा मिळणार ? (भाग 1)

भादवणमध्ये भाजपला नवा चेहरा मिळणार ? (भाग 1)

भादवण (आजरा) : भादवण हे गाव राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. गावात विविध गट आणि स्थानिक नेत्यांमुळे राजकारणात कायमच चुरस पाहायला मिळते. मागील काही काळात स्पष्ट नेतृत्वाच्या अभावामुळे गावातील भाजपची स्थिती नेमकी काय आहे, असा प्रश्न काही ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत होता.

दरम्यान, अलीकडेच समरजित घाटगे यांच्या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक स्तरावर नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला भादवणमध्ये नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गावाच्या विकासासाठी सर्वच पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. भविष्यात भादवणच्या राजकारणात कोणता नवा चेहरा पुढे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“Link Marathi” माध्यमातून स्थानिक घडामोडींना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न असून इच्छुकांनी आपली भूमिका मांडण्यासाठी संपर्क साधावा.

क्रमशः… भाग 2 मध्ये – “कोण असू शकतो भाजपचा पुढचा चेहरा ?” तुम्हाला काय वाटते….?

बातम्या देण्यासाठी संपर्क – अमित गुरव 8421666667

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular